नितेश राणेंवर नार्वेकरांचे खोचक ट्विट! भाजपचा तिळपापड…

140

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत संतोष परब यांना झालेल्या मारहाण प्रकरणी अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी नितेश राणेंचा अखेरचा प्रयत्न अयशस्वी झाला. त्यामुळे राणे पुन्हा अडचणीत आले आहेत. त्यांच्याविषयी शिवसेना नेते, सरचिटणीस मिलिंद नार्वेकर यांनी खोचक ट्विट केले आहे. हे ट्विट नितेश राणे यांच्यासह भाजपला चांगलेच जिव्हारी लागले आहे.

काय केले ट्वीट?

भाजप नेते, आमदार नितेश राणे यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन नाकारला आहे. तसेच त्यांना पुढील १० दिवसांत शरण येण्यास सांगितले आहे. तोवर त्यांना अटक करण्यात येऊ नये, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्यावर शिवसेना नेते, सरचिटणीस मिलिंद नार्वेकर यांनी ट्वीट केले आहे. नार्वेकर यांनी ‘लघु सुक्ष्म दिलासा’, असे म्हटले आहे. हे ट्वीट भाजपाच्या चांगलेच जिव्हारी लागले आहे. त्यावर राणे समर्थक आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनीही वादग्रस्त भाषेत उत्तर दिले आहे.

नितेश राणेंचे भवितव्य काय?

पुढच्या दहा दिवसात नितेश राणे यांनी नियमित जामिनासाठी कनिष्ठ न्यायालयात अर्ज करायचा आहे. त्याकरता दहा दिवसांची वेळ देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना अटकेपासून संरक्षण देण्यात आले आहे, असे राणेंचे वकील देसाई यांनी सांगितले, पण न्यायालयाने आदेश देऊन त्यांना नियमित जामिनासाठी अर्ज करण्यास सांगितले आहे. अटकपूर्व जामीन म्हणजे अटक होण्याच्या अगोदर किंवा अटक झाल्या झाल्या सीआरपीसी 438 नुसार अर्ज करता येतो. रेग्युलर जामीन म्हणजे अटक झाल्यानंतरचा जामीन असतो. त्यामुळे सत्र न्यायालयात जाऊन आम्हाला अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करावा लागेल. फरक फक्त एवढाच की, आम्ही स्वत:हून गेलो असलो तरी आम्हाला अटक झालेली नसेल. आम्ही पोलिसांच्या ताब्यात नसू. त्यामुळे आम्हाला दहा दिवसांचे संरक्षण आहे, असेही त्यांनी सांगितले.

(हेही वाचा नितेश राणेंच्या अडचणीत वाढ! जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयाचाही नकार)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.