पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात राख या गावातील रहिवासी आणि शिवसेनेचे नेते प्रकाश ताटे यांच्या मुलीचा विवाह गुरुवारी संपन्न झाला. या विवाहाच्या वेळी प्रकाश ताटे यांनी अवांतर खर्च टाळून, बचत झालेल्या पैशातून पुरंदर तालुक्यातील लोकांच्या सेवेसाठी रुग्णवाहिका भेट दिली आहे.
लोककल्याणाचे काम
राख येथील प्रकाश ताटे यांची कन्या योगिता प्रकाश ताटे व सातारा जिल्ह्यातील सिद्धेश्वर कुरोली येथील श्रीजित संभाजीराव देशमुख यांचा विवाह नुकताच बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथे संपन्न झाला. या विवाहामध्ये अवांतर होणारा खर्च या दोन्ही कुटुंबांकडून टाळण्यात आला. त्यामुळे या विवाहामध्ये वधू पित्याचे जे पैसे बचत झाले होते, त्या पैशांतून ताटे यांनी पुरंदर तालुक्यातील लोकांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली.
( हेही वाचा: बूस्टर डोस प्रभावी आहे की नाही? तज्ज्ञांच्या मनात शंका! )
माजी राज्यमंत्र्याकडून कौतुक
पुरंदरचे माजी आमदार व राज्याचे माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या हस्ते विवाहस्थळी या ॲम्बुलन्सचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष दिलीप यादव, आदर्श माजी जिल्हा परिषद सदस्य सुदाम इंगळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे बापूसाहेब भोर त्याचबरोबर अनेक वऱ्हाडी मंडळी उपस्थित होती. प्रकाश ताटे यांनी राबवलेल्या या उपक्रमाचं माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी कौतुक केलं.
Join Our WhatsApp Community