मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना भ्रष्टाचार प्रकरणात एसीबीकडून तिसरे समन्स बजावण्यात आलेले असून २ फेब्रुवारी रोजी त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. एसीबीकडे या भ्रष्टाचार प्रकरणात खुली चौकशी सुरु असून तिसरे समन्स बजावून देखील सिंग हे गैरहजर राहिल्यास त्यांच्याविरुद्ध वॉरंट काढण्याची शक्यता आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना एसीबीकडून तिसरे समन्स बजावण्यात आले असून २ फेब्रुवारी रोजी सिंग यांना एसीबी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. मुंबई पोलीस दलातील पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांनी सिंग यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करून एसीबीकडे तक्रार दाखल केली होती, या प्रकरणात एसीबीकडे खुली चौकशी सुरु आहे.
(हेही वाचा : त्यावर क्रीडांगणाचे आरक्षणच नाही, ती जागा तर सांडपाणी प्रकल्पाची : भाजपने केला भांडाफोड)
तिसरे समन्स
मुंबई पोलीस दलातील पोलीस अधिकारी अनुप डांगे यांनी परमबीर सिंग यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराची तक्रार दाखल केली होती. हे प्रकरण राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) चौकशीसाठी सोपवण्यात आले होते. या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे खुली चौकशी सुरु असून या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून या प्रकरणात संबंधितांची चौकशी करून त्यांचा जबाब नोंदवणे सुरु आहे. दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १० जानेवारी रोजी परमबीर सिंग चौकशीसाठी समन्स बजावले होते. परंतु सिंग हे चौकशीसाठी गैरहजर राहिले होते, त्यानंतर पुन्हा १८ जानेवारी रोजी त्यांना दुसरे समन्स पाठवण्यात आले होते. यावेळी ते कोविडचे कारण पुढे करून चौकशीला गैरहजर राहिले होते.
( हेही वाचा : डोंबिवलीत २० किलो गांजा जप्त! पोलिसांनी केले ‘हे’ आवाहन )
एसीबीने गुरुवारी परमबीर सिंग यांना तिसरे समन्स बजावले असून २ फेब्रुवारी रोजी त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. यावेळी परमबीर सिंग यांना एसीबीच्या खुल्या चौकशीला सामोरे जावे लागेल अन्यथा त्यांच्याविरुद्ध वॉरंट काढण्यात येण्याची शक्यता आहे.
Join Our WhatsApp Community