अरे वा…डिस्चार्ज संख्या अकरा हजारांहून जास्त

96

गुरुवारी सलग दुस-या दिवशी एका दिवसांत कोरोनाच्या रुग्णांच्या डिस्चार्ज संख्येत मोठ्या संख्येने वाढ झाली. गुरुवारी राज्यभरात २५ हजार ४२५ कोरोनाचे नवे रुग्ण आढळले. मात्र डिस्चार्ज रुग्णांची संख्या अकरा हजारांहून जास्त होती. गुरुवारी अकरा हजारांनी डिस्चार्ज रुग्ण जास्त होते. तब्बल ३६ हजार ७०८ कोरोना रुग्णांना एका दिवसांत डिस्चार्ज मिळाला.

सकारात्मक चित्र

राज्यात सध्या ९४.३२ टक्के रुग्ण होण्याचे प्रमाण नोंदवले जात असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. आता २ लाख ८७ हजार ३९७ कोरोनाच्या रुग्णांवर उपचार सुरु आहे. गेल्या तीन दिवसांपासून पुण्यातील रुग्णसंख्येत घट दिसून येत असल्याचे सकारात्मक चित्र आहे. गुरुवारी तीन हजार संख्येने पुण्यातील सक्रीय रुग्णांच्या संख्येत घट दिसून आली. पुण्यात सध्या ९० हजार ३०३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यामुळे मुंबई आणि ठाण्यापाठोपाठ पुण्यासारख्या जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांत आता कोरोना नियंत्रणात येण्यास सुरुवात झाल्याचे आरोग्य विभागाच्यावतीने सांगण्यात आले.

( हेही वाचा : चालू हंगामातील पहिला आंबा पोहोचला मुंबईत… )

गुरुवारी ४२ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यापैकी १२ मृत्यूची नोंदणी मुंबईत दिसून आली. नवी मुंबईत,सिंधुदुर्गात प्रत्येकी ४, ठाण्यात , साता-यात प्रत्येकी ३, कल्याण-डोंबिवलीत ५, मीरा-भाईंदर , कोल्हापूरमध्ये आणि कल्याणमध्ये प्रत्येकी १, नाशिकमध्ये २, अहमदनगरमध्ये, यवतमाळमध्ये, वर्ध्यात आणि औरंगाबादमध्ये प्रत्येकी १, नांदेडमध्ये ३ रुग्णांचा मृत्यू झाला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.