७३ व्या प्रजासत्ताक दिनी सकाळी ४३ वर्षीय अभिजीत बेर्डे या रुग्णाकडून मृत्यूपश्चात चार गरजू रुग्णांना अवयवदान मिळाले. गिरगाव येथील सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयाने ऍपनिया चाचणीनंतर त्याला मेंदू मृत घोषित केले. कुटूंबीयांनीच पुढाकार घेत रुग्णाच्या मृत्यूपश्चात अवयदानाचा निर्णय घेत समाजासमोर नवा आदर्श निर्माण केला.
अभिजीत बेर्डे यांना गंभीर डोकेदुखी आणि चक्कर येऊ लागल्याने सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर काहीच क्षणात बेर्डे बेशुद्ध झाले आणि त्यांचा श्वासोच्छवास कमी होऊ लागला. डॉक्टरांनी त्यांना त्वरित कृत्रिम प्राणवायूचा आधार दिला. सीटी स्कॅन तपासणीत बेर्डे यांना ब्रेन हॅमरेज झाल्याचे दिसून आले.
(हेही वाचा -बापरे! देवगडच्या समुद्रावर विचित्र आकाराची सुरमई)
कुटुंबीयांनी अवयवदानासाठी पुढाकार घेतल्यानंतर रिलायन्स फाऊंडेशनमधील अवयवप्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णाला प्रत्यारोपण शस्त्रक्रियेच्या माध्यमातून एक मूत्रपिंड आणि हृदय मिळाले. दुसरे मूत्रपिंड नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयाला तर यकृत परळ येथील ग्लोबल रुग्णालय आणि डोळ्यातील कॉर्निया बच्चूभाई नेत्रपेढीला दान करण्यात आला.
Join Our WhatsApp Community