कोकण रेल्वेसाठी गुरुवारचा दिवस ऐतिहासिक आहे. गुरुवारी कोकण रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच इलेक्ट्रीक इंजिनवर कोकण रेल्वे धावली. हा मान दिवा- रत्नागिरी- सावंतवाडी पॅसेंजर गाडीला मिळाला आहे. रत्नागिरीनंतर ही गाडी डिझेल इंजिनवर धावली.
इलेक्ट्रीक इंजिनवर धावली रेल्वे
कोकण रेल्वे डिझेलच्या इंजिनवर धावते. त्यामुळे प्रदूषणात वाढ व्हायची, तसेच तांत्रिक अडचणी आणि मर्यादा यायच्या.
पण, आता पहिल्यांदाच इलेक्ट्रीक इंजिनवर कोकण रेल्वे धावल्याने प्रदूषण कमी होण्याला मदत होणार आहे. तसेच मागच्या काही वर्षात कोकण रेल्वे मार्गावर जे विद्युतीकरण करण्यात येत आहे, त्याचाच परिणाम म्हणून आता इलेक्ट्रिक इंजिनवर एक्सप्रेस चालवण्यात येत आहे.
रत्नागिरीच्या सुपुत्रांना मान
विजेवर धावणाऱ्या पहिल्या पॅसेंजर गाडीचे कोकण रेल्वेच्या हद्दीत कोकण रेल्वेकडून स्वागत करण्यात आले. या गाडीला वीस डबे होते. दिवा येथून प्रवाशांना घेऊन आलेली चाचणी यशस्वी झाली. विशेष म्हणजे विद्युत इंजिनवर चालणारी पहिली गाडी चालवण्याचा पहिला मान रत्नागिरीतील सुपुत्रांना मिळाला गाडीचा लोको पायलट, सहाय्यक लोको पायलट तसेच गार्ड हे तिघेही रत्नागिरीचे सुपुत्र आहेत. दिवा ते रत्नागिरी दरम्यान धावणारी ही गाडी आता रोज इलेक्ट्रिक लोकोसह धावणार आहे.
( हेही वाचा :भिवंडीत अग्नितांडव! भीषण आगीत तीन फर्निचर गोदाम जळून खाक )