मैदानाला अनधिकृतरीत्या टिपूचे नाव देणाऱ्या सेनेला महात्म्यांच्या नावाचा विसर!

भाजपाचा आंदोलनाचा इशारा

118

मालाडमधील मैदानाला अनधिकृतरित्या क्रूरकर्मा टिपू सुलतानचे देणाऱ्या सत्ताधारी शिवसेनेला मात्र, वरळी बी.डी.डी. चाळीतील जांभोरी मैदानावर महात्मा गांधीजींच्या नावाचा फलक लावण्याचे देखील भान उरले नाही. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते मैदानाचे लोकार्पण झाल्यावरही सत्तेसाठी धर्मांध शक्तींशी हातमिळवणी करणाऱ्यांना महात्म्याचा विसर पडावा हे दुर्दैवी आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी शुक्रवारी स्थायी समितीत माहितीचा मुद्दा उपस्थित करत केली.

…तर भाजपतर्फे गांधीगिरी स्टाईलने आंदोलन

मैदानात दहा दिवसामध्ये महात्मा गांधीजींच्या नावाचा फलक न लावल्यास भाजपतर्फे गांधीगिरी स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिंदे यांनी दिला. जांभोरी मैदानास स्वातंत्र्य लढ्यामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचा पदस्पर्श झाला होता. स्वातंत्र्यानंतर या मैदानाचे नामकरण ‘महात्मा गांधी मैदान’ असे करण्यात आले. या मैदानाला ऐतिहासिक व हेरिटेज दर्जा प्राप्त झाला आहे. नुकतेच या मैदानाचे सुशोभिकरण करण्यात आले. राज्याचे पर्यावरण मंत्री यांच्या शुभहस्ते त्यांच्याच मतदार संघातील या उद्यानाचे लोकार्पणही करण्यात आले. परंतु या संपूर्ण मैदानाचे नूतनीकरण केल्यानंतर मैदानातील कुठल्याही प्रवेशद्वारावर अथवा पर्यावरण मंत्री यांच्या ट्विटमध्ये महात्मा ‘गांधी मैदान’ असा उल्लेख नाही.

BJP 4

(हेही वाचा -टिपू सुलतान उद्यान नामकरण प्रकरणः भाजप आमदार साटम यांचे मुख्यमंत्र्यांना थेट पत्र, म्हणाले…)

शिंदे यांनी सत्ताधाऱ्यांना धरले धारेवर 

पर्यावरण मंत्री, महापौर, आयुक्त या ऐतिहासिक मैदानाचे नाव विसरलेत काय? क्रूरकर्मा टिपू सुलतानच्या अनधिकृत नामफलकाला संरक्षण देणारे, आजही अनधिकृत नामफलक दिमाखात प्रवेशद्वारावर मिरवत ठेवणारे महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेचे नेते आता वरळीतील मैदानावर अधिकृत नामकरणाचा फलक ‘महात्मा गांधी मैदान’ असा त्वरित लावतील काय? असे प्रश्न उपस्थित करत गटनेते शिंदे यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले.

विश्व हिंदू परिषद आणि भाजपचा विरोध

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने 26 जानेवारी रोजी 18 व्या शतकातील वादग्रस्त म्हैसूर शासक टिपू सुलतानच्या नावावर मुंबईतील क्रीडा संकुलाचे उदघाटन काँग्रेस नेते आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते झाले. या मैदानाला टिपू सुलतानाचे नाव दिल्याने राजकीय वादाला तोंड फुटले आहे. याला विश्व हिंदू परिषद आणि भाजपने विरोध केला आहे. एखाद्या प्रकल्पाचे नाव “क्रूर हिंदूविरोधी” देणे निंदनीय बाब आहे, असे भाजपचे म्हणणे आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.