बिहारच्या गया येथे भारतीय आर्मी ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीचे विमान प्रशिक्षणादरम्यान उड्डाण घेतल्यानंतर लगेचच कोसळले. विमानातील दोन्ही पायलट सुरक्षित आहेत. लष्कराचे हे सूक्ष्म विमान एका शेतात कोसळले.
ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीचे अधिकारीही घटनास्थळी पोहोचले
बोधगयाच्या बगदाहा गावात हा अपघात झाला. विमान पडल्यानंतर परिसरात घबराट पसरली होती. विमान अपघातानंतर तिथे स्थानिकांनी एकच गर्दी केली. यावेळी गर्दीतील काही लोकांनी प्रथम अपघातादरम्यान कोणतीही जीवितहानी झाली नाही, याची चाचपणी केली आणि नंतर या लोकांनी विमानाचा पुढचा भाग पकडला आणि तो खेचायला सुरुवात केली आणि बाकीचे लोक त्याला ढकलायला लागले. गावकऱ्यांनी विमान खेचले आणि अपघातस्थळापासून दूर नेले. त्याचवेळी, अपघातानंतर ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीचे अधिकारीही घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर सैन्य अधिकाऱ्यांनी अपघातग्रस्त विमान पुन्हा अकादमीत नेले.
(हेही वाचा प्रवाशांनो, लक्ष द्या! रविवारी मध्य रेल्वेच्या ‘या’ मार्गावर मेगाब्लॉक!)
Join Our WhatsApp Community