श्रीमलंग गडाच्या बाजूचा पहाडेश्वर पर्वतही मुसलमानांच्या ताब्यात! वन विभागाची भूमिका संशयास्पद

126

राज्यातील गड- किल्ल्यांवर त्या त्या भागातील मुसलमानांनी बिनदिक्कतपणे थडगी, मदार आणि मशिदी बांधून ते बळकावण्याचा सपाटा चालवला आहे. श्रीमलंग गड यातील अत्यंत वाईट उदाहरण बनले आहे. राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, मतांचे राजकारण आणि स्थानिक प्रशासनाची निष्क्रियता या कारणांमुळे श्रीमलंग गड एकेकाळी नवनाथ यांचे समाधीस्थळ म्हणून ओळखले जात होते, आता ते ‘हाजी अब्दुर्रहमान मलंग शाहबाबा’ म्हणून ओळखले जावू लागले आहे. याचा आता विरोध होवू लागला असताना यात आता श्रीमलंग गडाच्या बाजूला असलेल्या पहाडेश्वर पर्वताचीही भर पडली आहे.

पहाडेश्वर पर्वतावर असे झाले अतिक्रमण

  • या पर्वतावर ९ आणि खाली २ थडगी अनधिकृतपणे उभारण्यात आली आहेत. विशेष म्हणजे या ठिकाणी पुरातन शिवपिंडी आणि नंदी होता. मुसलमानांनी ते हटवून त्या ठिकाणी थडगी बांधली आहेत.
  • मुसलमानांकडून या पर्वतावरील अतिक्रमण होत असल्याचे लक्षात आल्यावर स्थानिक हिंदुत्वनिष्ठांनी या पर्वताखालील शिव मंदिराचा जीर्णोद्धार पदरचे पैसे खर्च करून केला. आणि तेथील शिवपिंडी आणि नंदीची पुन्हा स्थापना केली.

(हेही वाचा श्री मलंग गडावर महाआरतीत मुसलमानांचा हैदोस!)

Shiv

  • ज्याप्रमाणे मुसलमानांनी श्रीक्षेत्र मलंगगडाचे ‘हाजी अब्दुर्रहमान मलंग शाहबाबा’ असे नामकरण केले आहे, तसेच या संपूर्ण पर्वताचीही ओळख पुसून टाकण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यासाठी या पर्वताला ‘दादी माँ पर्वत’, तर कार्तिक-गणेश पर्वताचे ‘पाच पीर पर्वत’ असे नामकरण केले आहे.
  • या पर्वतावर जागोजागी २ हिरवे झेंडे उभारले आहेत. पक्के बांधकाम करण्यात आले आहे. पर्वतावरील सर्व थडग्यांना हिरव्या चादरी चढविण्यात आली आहे.

Jhenda

  • पहाडेश्वर पर्वतावर साधूपुरुष रामबाबा यांची समाधी आहे. हिंदु साधूंची समाधी असूनही त्यावर हिरवी चादर चढवली आहे.
  • पर्वतावर धर्मांधांनी वजनाने अतिशय जड असलेला एक ‘जनरेटर’ नेऊन ठेवला आहे. या जनरेटरच्या आधारे पर्वतावर रोषणाई करण्यात येते, तसेच ध्वनीक्षेपक लावण्यात येतो.

श्रीमलंग परिसरात पहाडेस्वर पर्वत हा मध्यंतर आहे. या पर्वतावर देखील समाधी आहेत. या पर्वतावर मंदिर आहे. त्या ठिकाणीही मुसलमानांनी अतिक्रमण केले आहे. पूर्वी तिथे जाणारे लोक कमी होते, आता मुसलमानांची वर्दळ वाढत आहे. ही जागा वन विभागाच्या मालकीची आहे, पण वन विभाग त्याकडे दुर्लक्ष करत आहे, पोलिसही लक्ष देत नाहीत. सरकार बदलल्यामुळे आता येथे अतिक्रमण अधिक वाढले आहे. पूर्वी तिथे देवीचे सागवानी लाकडाचे मंदिर होते, ते मंदिर जाळले, उद्धवस्त केले. आता आम्ही तेथील शिवलिंग आणि नंदी याचा जीर्णोद्धार करणार आहे. त्या खालील शिव मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे.

राजेश गायकर, विश्व हिंदू परिषद, धर्मप्रसार प्रमुख, अंबरनाथ जिल्हा.

पहाडेश्वर पर्वतही वक्फच्या ताब्यात देण्याचा कट 

आधीच श्रीमलंग गडावर झालेल्या अतिक्रमणाकडे सरकारचे दुर्लक्ष झाल्याने आता हा गडच वक्फ बोर्डाची मालमत्ता असल्याचे सिद्ध करण्याचा मुसलमानांच्या खटाटोप सुरू झाला आहे. त्याविरोधात आता स्थानिक हिंदुत्वनिष्ठांनी कायदेशीर लढा सुरू केला आहे. उद्या मुसलमान पहाडेश्वर पर्वतावरही मालकीहक्क गाजवण्याचा प्रयत्न करतील, अशी भीती आहे.

(हेही वाचा श्री मलंग गड मुसलमानांचे नव्हे, हिंदूंचे श्रद्धास्थान! काय आहे इतिहास?)

वन विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष

या पर्वताची जागा ही वन विभागाच्या मालकीची आहे. तरीही या पर्वतावर मुसलमानांनी बिनदिक्कतपणे अतिक्रमण केले आहे. याकडे वन विभागाचे दुर्लक्ष होत आहे, यावरून वन विभागाची भूमिका संशयास्पद वाटत आहे. वनविभागाने दुर्लक्ष केल्यामुळे आता मुख्य पर्वताच्या खालीही २ थडगी बांधली असून थाडग्यांची एकूण संख्या ११ वर गेली आहे. ती वाढण्याचा धोका आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.