शुक्रवारी भंडा-यात सहा वर्षाचा वाघ मृतावस्थेत आढळून आला. वर्षाच्या पहिल्याच महिन्यात चार वाघांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. रुद्र (बी२) असे या वाघाचे नाव असून, वीजेच्या धक्क्याने या वाघाचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाने व्यक्त केला.
वनविभागाने वाघाचा मृतदेह ताब्यात घेतला
शनिवारी दुपारी दोन वाजता वाघ शेतात मृतावस्थेत आढळून आल्याची माहिती वनविभागाला मिळाली. तासाभरात वाघाचा मृतदेह वनविभागाने ताब्यात घेतला. पलाडी-माथाडी मार्गावरील शेतात वाघाचा मृतदेह आढळून आला. ही जागा कोका वन्यजीव अभयारण्यापासून ५ किलोमीटर अंतरावर आहे. कोका वन्यजीव अभयारण्य हा नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात मोडला जातो.
( हेही वाचा: “बदलत्या काळासोबत नव्या तंत्रज्ञानाच्या साथीने बालभारती बदलतंय” )
विजेच्या कुंपणामुळे मृत्यू
वाघ ज्या शेतात मृतावस्थेत आढळून आला तिथे रानडुक्करांची मोठी समस्या आहे. त्यामुळे शेतक-यांनी विजेचे कुंपण लावले होते. ही जागा शेताचीच आहे. शिवाय वाघाच्या शरीरावर विजेच्या धक्क्यामुळे काही ठिकाणी काळे चट्टे उमटलेत. या प्रकऱणी वाघाच्या शरीरावरील कोणताही अवयव काढण्याचा प्रयत्न झालेला नसल्याची माहिती वनविभागाने दिली. याआधीच्या तीन वाघांच्या मृत्यूमध्ये काही अवयवांची शिकार झाल्याचे आढळून आले आहे.
Join Our WhatsApp Community