असोसिएशन फाॅर डेमोक्रॅटिक रिफाॅर्म्सच्या ताज्या अहवालात 2019-20 या आर्थिक वर्षात देशातील राजकीय पक्षांची संपत्ती किती हे सांगण्यात आले आहे. या अहवालानुसार, भाजप हा देशातील सर्वात श्रीमंत पक्ष ठरला असून, या पक्षाची घोषित संपत्ती 4487.78 कोटी रुपये आहे. तर, काॅंग्रेस मात्र या यादीत 588.16 कोटी रुपयांच्या घोषित संपत्तीसह तिस-या स्थानी आहे. असं असलं तरीही या पक्षावर 50 कोटी रुपयांचं देणही आहे.
शिवसेनेकडे किती संपत्ती?
एडीआरच्या यादीत भाजपाच्या मागोमाग बसप पक्ष असून, त्याची एकूण संपत्ती 698.33 कोटी आहे. त्यानंतर काॅंग्रेस 588.16 कोटी रुपयांसह तिस-या स्थानी आहे. त्यानंतर 563.47 कोटींसह समाजवादी पक्ष चौथ्या स्थानी, पाचव्या स्थानी तेलंगण राष्ट्र समिती 301.47 कोटी, अण्णा द्रमुक 267.61 कोटी रुपयांसह सहाव्या स्थानी, तर शिवसेना 148.46 कोटी रुपयांसह सातव्या स्थानी आहे.
राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांची संपत्ती
असोसिएशन फाॅर डेमोक्रॅटिक रिफाॅर्म्स एडीआरच्या ताज्या अहवालात राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षांकडील घोषित संपत्तीची आणि देण्यांचीही माहिती मिळते. 2019-20 या आर्थिक वर्षात देशातील सात राष्ट्रीय पक्षांनी 6988.57 कोटी रुपये आणि 44 प्रादेशिक पक्षांनी 2129.38 रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे.
पक्षांवरील कर्ज
राजकीय पक्षांवरील एकूण देणी कोटी रुपये आणि प्रादेशिक पक्षांवरील देण्यांचे ओझे कोटी रुपये आहे. सात राष्ट्रीय पक्षांवरील देण्यांची रक्कम 74.27 कोटी आहे. यात उधारीवर घेतलेल्या 4.26 कोटी आणि अन्य मार्गांनी घेतलेल्या देण्याची रक्कम 70.01 कोटी रुपयांची देणगी चुकवायची आहेत, तर तृणमूल काॅंग्रेसला कोटी रुपयांचे देणे फेडायचे आहे.
Join Our WhatsApp Community