विश्वास नांगरे-पाटील यांची बदली, दीपक पांडे नाशिकचे नवे पोलीस आयुक्त;

262

नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांची मुंबईच्या सहआयुक्तपदी (कायदा व सुव्यवस्था) निवड झाली आहे. त्यांच्या जागेवर पुणे-चिंचवड महापालिकेचे आयुक्त दीपक पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे नाशिक रेंजच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी प्रताप दिघावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मावळते विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे यांची मुंबईत तुरुंग महानिरीक्षक म्हणून बदली झाली आहे. याशिवाय पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांचीही अमरावतीच्या आयुक्तपदी बढतीवर बदली झाली आहे.

पोलिस दलातील बहुचर्चित बदल्यांचा आदेश जारी झाला असून, नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील (कायदा व सुव्यवस्था) आणि मिलिंद भारंबे (गुन्हे) यांची मुंबईच्या सहआयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. विनयकुमार चौबे यांची अतिरिक्त पोलीस महासंचालक (लाचलुचपत प्रतिबंधक) येथे नियुक्ती झाली आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त म्हणून के. व्यंकटेशम आणि ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांना आहे तेथेच ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या दोन प्रमुख शहरांत नवे पोलिस आयुक्त येणार नाहीत.

अशा आहेत बदल्या

  • विश्वास नांगरे पाटील सह आयुक्त कायदा – व सुव्यवस्था मुंबई
  • बिपीन सिंग , नवी मुंबई पोलीस आयुक्त
  • डॉ आरती , पोलीस आयुक्त अमरावती
  • मनोज लोहिया , आयजीपी कोल्हापूर क्षेत्र
  • रंजित सेठ महासंचालक , लाचलुचपत विभाग
  • प्रताप दिघावकर , आयजीपी , नाशिक क्षेत्र
  • कृष्ण प्रकाश , पोलीस आयुक्त , पिंपरी चिंचवड
  • दीपक पांडे , नाशिक पोलीस आयुक्त
  • जगजीत सिंह , अतिरिक्त पोलीस महासंचालक , लाचलुचपत विभाग
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.