संजय राऊतांचं ‘झिंग झिंग झिंगाट’ झाले! पडळकरांची खोचक टीका

95

जनाब संजय राऊत हे देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपामुळे पुरते बावचळले आहेत. या भितीपोटी की ते परदेशात वाईन मालकांसोबत झालेल्या बैठकीबाबत खुलासा करतील. त्यामुळेच राऊतांचे ‘झिंग झिंग झिंगाट‘ झाले आहे, अशी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.

शरद पवारांच्या नावाचा वापर चुकीचे

जे आजपर्यंत कधी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना भोगावे लागले नाही. ते महाविकास आघाडीच्या काळात शेतकऱ्यांना भोगावे लागले. गावच्या गाव अंधारात लोटले गेले. ऐन कापणीच्या हंगामात वीज तोडली गेली. त्यांच्यावर बळाचा वापर करण्यात आला. जर खरोखरच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांबद्दल तुम्ही हे धोरण राबवत असाल, तर हे नमूद करणार की तुम्ही महाराष्ट्रात निर्माण झालेल्या वाईनलाच विक्रीची परवानगी असणार. परदेशात झालेल्या बैठकीतील कंपन्यांना नाही. शरद पवारांच्या नावाचा वापर करून आपण विक्रीचं समर्थन करत आहात. मला खात्री आहे की, जे पवारांनी आयुष्यात खुप सोसलं आहे आणि त्याची खंतही जाहीरपणे व्यक्त केलेली आहे, त्यामुळेच ते महाराष्ट्राच्या तरूण पिढीला नशेत ढकलण्याची भूमिका कधीही घेणार नाही, असेही आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले.

(हेही वाचा श्रीमलंग गडाच्या बाजूचा पहाडेश्वर पर्वतही मुसलमानांच्या ताब्यात! वन विभागाची भूमिका संशयास्पद)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.