मुंबईच्या २३६ प्रभागांच्या आराखड्याला मान्यता! या तारखेपासून हरकती व सूचना

158

मुंबई महापालिकेच्या २३६ प्रभागांचा अंतिम आराखडा मुंबई महापालिकेने राज्य निवडणूक आयोगाला सादर केला होता. या आराखड्याला राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. त्यानुसार आता राज्य निवडणूक आयोगाने महापालिका आयुक्तांना शिफारस करत यासाठी हरकती व सूचना मागविण्याची सूचना केल्या असून त्यानुसार याची यादी प्रसिद्ध करून प्रभाग रचनेबाबत १ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी या कालावधीत हरकती व सूचना मागवल्या जाणार आहेत.

Letter 3

२३६ प्रभाग बनवण्यात आलेले आहेत

मुंबई महापालिकेच्या २२७ प्रभागांच्या ऐवजी २३६ प्रभाग बनवण्यात आलेले आहेत. राज्य मंत्रिमंडळाने २३६ प्रभाग बनवण्याचा निर्णय घेतला होता. या नवीन २३६ प्रभागांच्या सीमा निश्चित करून त्याचा आराखडा राज्य निवडणूक आयोगाला मुंबई महापालिका निवडणूक विभागाच्या माध्यमातून मागील आठ दिवसांपूर्वी सादर करण्यात आला होता. या अंतिम प्रभाग आराखड्याला राज्य निवडणूक आयोगाची मान्यता मिळते की, अजून त्यामध्ये त्रुटी काढून त्याच्या निवारणासाठी पुन्हा महापालिका निवडणूक विभागाकडे सादर केल्या जातात का, याबाबतची शक्यता वर्तवली जात असतानाच २८ जानेवारी रोजी राज्य निवडणूक आयोगाने मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांना २३६ प्रभागांच्या बाबतचा कार्यक्रम जाहीर करण्याची शिफारस केली आहे. या अंतर्गत २३६ विभागांच्या सीमा आणि याबाबत जनतेकडून हरकती व सूचना मागवण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने कार्यक्रम निश्चित करून दिला आहे.

(हेही वाचा श्रीमलंग गडाच्या बाजूचा पहाडेश्वर पर्वतही मुसलमानांच्या ताब्यात! वन विभागाची भूमिका संशयास्पद)

१ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी या कालावधीत हरकती व सूचना मागवल्या जाणार

त्यानुसार १ फेब्रुवारी रोजी याबाबतची अधिसूचना जारी करून याबाबतची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे आणि याच एक फेब्रुवारीपासून संकेतस्थळावर २३६ प्रभागांची यादी प्रसिद्ध करून जनतेकडून हरकती व सूचना मागविल्या जाणार आहेत. त्यानुसार १ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी या कालावधीत हरकती व सूचना मागवल्या जाणार आहेत. त्यानंतर १६ फेब्रुवारी रोजी हरकती व सूचनांचे विवरण राज्य निवडणूक विभागाला सादर केले जाणार आहे. त्यानंतर २६ फेब्रुवारी पर्यंत हरकती व सूचनांची अंतिम सुनावणी केली जाईल आणि २ मार्च रोजी शिफारशीसह विवरण राज्य निवडणूक आयोगाने सादर करावे असे या पत्रात म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.