प्रवीण दरेकरांच्या गाडीला अपघात…

140

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या गाडीला अपघात झाला आहे. धुळे येथून ते मुंबईला परतत असतांना त्यांच्या वाहनाला हा अपघात झाला आहे. या अपघातात प्रवीण दरेकर थोडक्यात बचावले आहेत.

प्रवीण दरेकर हे धुळ्यातून मुंबईला येत होते. चारचाकी वाहनातून ते येत असताना एका माणसाला वाचवताना दरेकर यांच्या गाडीला हा अपघात झाला आहे. या अपघात दरेकर यांची गाडी थोडक्यात बचावली. त्यामध्ये दरेकर सुखरूप आहेत, अशी माहिती मिळत आहे. ते मालेगाव येथे पोहचले असताना तिथे हा अपघात झाल्याची माहिती आहे. प्रवीण दरेकर हे धुळे कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी पक्षाच्या कामाकरता गेले होते, असे समजते. प्रवीण दरेकर यांची गाडी मालेगाव येथून नाशिल शहरात प्रवेश करताच त्यांच्या वाहनाला बाजूची वाहने धडकली. या अपघात दरेकर यांच्यासोबत त्यांचे सर्व सहकारी सुरक्षित आहेत, अशी माहिती आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.