राज्यात थंडीच्या कडाक्याने ओमायक्रॉन पसरणार नाही! तज्ज्ञांची माहिती

138

आठवडाभर थंडीच्या कडाक्यामुळे सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढलेले असताना थंडीचे वातावरण ओमायक्रॉनच्या वाढीसाठी पोषक नसल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. या दिलासादायक बातमीमुळे ओमायक्रॉन हा मुख्यत्वे आंतरराष्ट्रीय प्रवास केलेल्या प्रवाशांकडून तसेच सहसंपर्कातूनच पसरला जात असल्याची माहितीही तज्ज्ञांनी दिली.

कोरोनाच्या दोन्ही लाटा या मार्च २०२० आणि फेब्रुवारी २०२१ च्या दरम्यान भारतात धडकल्या. तिसरी लाट येत्या फेब्रुवारी महिन्यातच धडकेल, असा अंदाज आरोग्य विभागाला होता. मात्र डिसेंबर महिन्याच्या अखेरीस २६ तारखेपासूनच देशभरात ओमायक्रॉनच्या विषाणूचा झपाट्याने प्रसार झाला आणि तिसरी लाट आली. तिस-या लाटेत देशातच नव्हे तर ओमायक्रॉनची बाधा झालेल्या सर्वच देशांत व्हायरल फिव्हरची साथ मोठ्या प्रमाणात पसरली. त्यामुळे ओमायक्रॉन हा कोरोनाच्या मूळ विषाणूपेक्षा पाच पटीने वेगाने पसरत असल्याचे वैद्यकीय क्षेत्राकडून जाहीर करण्यात आले.

(हेही वाचा मुंबईच्या २३६ प्रभागांच्या आराखड्याला मान्यता! या तारखेपासून हरकती व सूचना)

थंडीत ओमायक्रॉन पसरेल हा गैरसमज

डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठड्यात तिस-या लाटेचे आगमन झाले होते, त्यावेळी थंडीचा कडाका नव्हता. आता थंडीचा प्रभाव राज्यभरात सुरु असताना ओमायक्रॉन पसरेल, हा समज बाळगणे चुकीचे असल्याची माहिती राज्याच्या कोरोना आजारावरील मृत्यू निश्चित समितीचे सदस्य डॉ. अविनाश सुपे यांनी दिली. सध्या केवळ थंडीच्या प्रभावामुळे व्हायरल फिव्हर दिसून येईल, अशी माहितीही डॉ. सुपे यांनी दिली.

दमेकरी रुग्ण वाढले

थंडीमुळे पारा खाली जाताच मंगळवारपासून सर्दी, खोकल्याच्या रुग्णांची रांगा लावल्याची माहिती फिजिशियन डॉ. दीपक बैद यांनी दिली. मात्र अचानक थंडीच्या वाढत्या प्रभावामुळे अजूनही दम्याच्या रुग्णांना त्रास होत असल्याचेही ते म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.