मुंबईतील महापालिकेच्या प्रभागांची संख्या २२७ वरून २३६ एवढी करण्यात आली आहे. या २३६ प्रभागांची सिमा निश्चित करण्यात आल्यानंतर या २३६ प्रभागांमध्ये एकूण लोकसंख्येच्या तुलनेत तेथील अनुसूचित जाती (एस.सी) समाजाच्या लोकांची अधिक संख्याही समोर आली. यामध्ये किमान ८ टक्के ते कमाल ४४ टक्के अनुसूचित जातीची लोकसंख्या असलेल्या प्रभागांची संख्याच ४० एवढी आहे.
वाढीव प्रभाग राखीव प्रवर्गाच्या वाट्याला नाही
मात्र, प्रभागांची संख्या वाढली, तरी राखीव प्रवर्गांसाठीच्या प्रभागांमध्ये कोणतीही वाढ दर्शवली गेली नाही. त्यामुळे जे प्रभाग वाढणार ते खुल्याप्रवर्गातच वाढले जाणार आहेत. यामध्ये नव्याने निर्माण होणाऱ्या प्रभागांमधील प्रभाग क्रमांक १५५मध्ये सर्वाधिक म्हणजे ४४ टक्के अनुसूचित जातीच्या लोकांची संख्या आहे. तर त्याखालोखाल प्रभाग क्रमांक १९२मध्ये २७.६३टक्के ‘एस.सी’ समाजाची लोकसंख्या आहे.
२३६ प्रभागांमध्ये अनुसूचित जातीच्या समाजाची लोकसंख्या ८ लाख ३,२३६
मुंबई महापालिकेच्यावतीने २०११च्या जनगणेनुसार प्रभागांची रचना करून यांची संख्या २३६ एवढी केली आहे. यामध्ये प्रभागांची संख्या २३६ एवढी केलेली असून यामध्ये अनुसूचित जातीच्या समाजाची लोकसंख्या ८ लाख ०३ हजार २३६ एवढी आहे. मागील सन २०१७च्या निवडणुकीत २२७च्या प्रभागांचे आरक्षण सोडत काढताना एससीसाठी १५ प्रभागांकरता राखीव ठेवत सोडत काढली होती. यामध्ये अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी ८ जागी तर अनुसूचित पुरुष प्रवर्गासाठी ७ जागी अशाप्रकारे एकूण १५ जागी आरक्षण सोडत काढली होती. परंतु प्रभागांची संख्या आता २,३५६ एवढी करताना एससीच्या प्रवर्गांसाठी राखीव प्रवर्गांमध्ये कोणत्याही प्रकारची वाढ दर्शवली गेली नाही. विशेष म्हणजे १५ टक्केपर्यंत लोकसंख्या असलेल्या प्रभागांची एकूण १७ एवढी आहे. तर यासाठी १५ प्रभाग राखीव ठेवत सोडत काढली जाते. त्यामुळे यापैकी कोणत्या प्रभागात एससीचे आरक्षण पडले जाते याकडे सर्वांचे लक्ष आहे.
(हेही वाचा मुंबईच्या २३६ प्रभागांच्या आराखड्याला मान्यता! या तारखेपासून हरकती व सूचना)
प्रभागांमधील एकूण लोकसंख्येपैकी एससी लोकसंख्येची टक्केवारी
- प्रभाग क्रमांक १५५ : ४४.७१
- प्रभाग क्रमांक १९२ : २७.६३
- प्रभाग क्रमांक १५६: २०.९१
- प्रभाग क्रमांक १६० : २०.७१
- प्रभाग क्रमांक १५०: २०.५४
- प्रभाग क्रमांक १५१: १९.५१
- प्रभाग क्रमांक १९५ : १८.३१
- प्रभाग क्रमांक १२१ : १७.९९
- प्रभाग क्रमांक २०६ : १६.९९
- प्रभाग क्रमांक १४६ : १६.९८
- प्रभाग क्रमांक २२४ : १६.९१
- प्रभाग क्रमांक १८९ : १७.९५
- प्रभाग क्रमांक २०२ १७.१९
- प्रभाग क्रमांक १४५ : १६.९२
- प्रभाग क्रमांक १३७ : १५.८९
- प्रभाग क्रमांक २०७ : १५.२०
- प्रभाग क्रमांक १५४ : १५.११
- प्रभाग क्रमांक ९५ : १४.८२
- प्रभाग क्रमांक १११ : १४.७९
- प्रभाग क्रमांक २७ : १४.३८
- प्रभाग क्रमांक ९८ : १३.९९
- प्रभाग क्रमांक १२९ : १३.९०
- प्रभाग क्रमांक १२६ : १३. ६४
- प्रभाग क्रमांक १७५ : १३.३०
- प्रभाग क्रमांक १८७ : १२.५१
- प्रभाग क्रमांक १२४ : १२.०७
- प्रभाग क्रमांक १५२ : १२.०७
- प्रभाग क्रमांक १४७ : ११.५०
- प्रभाग क्रमांक ५५ :११.५१
- प्रभाग क्रमांक १७९ : ११.४९
- प्रभाग क्रमांक २०३ : ११.३४
- प्रभाग क्रमांक २०४ : ११.०७
- प्रभाग क्रमांक ११९: १०.९९
- प्रभाग क्रमांक ६० : १०.७५
- प्रभाग क्रमांक १३९ : १०.६१
- प्रभाग क्रमांक १५९ : १०. १९
- प्रभाग क्रमांक १९० : १०.२१
- प्रभाग क्रमांक १९४ :१०.०२
- प्रभाग क्रमांक २२१ : १०.७२
- प्रभाग क्रमांक २३४ : १०.९८
- प्रभाग क्रमांक १०७ : ९.४०
- प्रभाग क्रमांक ९४ : ८.९३
- प्रभाग क्रमांक २० : ८.७९
- प्रभाग क्रमांक ५४ : ८.१७
- प्रभाग क्रमांक १४ : ८.१४