मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महिलांचे प्रभाग ११४ वरून ११८

127
मुंबई महापालिकेच्या २३६ प्रभागांना राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिल्यानंतर विभागांच्या सीमांबाबत हरकती व सूचना मागविल्या जाणार आहेत. मात्र या २३६ प्रभागांमध्ये भेट अनुसूचित जातीच्या १५ आणि अनुसूचित जमातीचा ०२ यासह महिलांच्या एकूण ११८ जागा राखीव होणार आहेत. त्यामुळे  उर्वरित सर्व जागा खुल्या प्रवर्गातील मोडल्या जाणार आहेत. ओबीसी आरक्षणाबद्दल बाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नसल्यामुळे तूर्तास तरी ओबीसी शिवाय ही निवडणूक प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याचे स्पष्ट होत आहे. २०१७ च्या निवडणुकीत महिलांसाठी ११४ जागा राखीव होत्या, त्या तुलनेत यावेळेस ११८ जागा राखीव राहणार आहेत.
मुंबई महापालिकेच्या २३६ विभागाची ही प्रभाग रचना  २०११ च्या जनगणनेनुसार ०१ कोटी २४ लाख  ४२ हजार २७३ लोकसंख्येवर आधारित बनवण्यात आली आहे. यामध्ये सरासरी ५२ हजार ७२२ लोकसंख्येचा आधार घेत प्रभाग रचना करताना कमीत कमी ४७ हजार ४५० आणि जास्तीत जास्त ५७ हजार ९९४ याप्रमाणे लोकसंख्या गृहीत धरली आहे. यामध्ये अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील ८ लाख २३६ एवढी लोकसंख्या दर्शवली आहे, तर अनुसूचित  जमातीची १ लाख २९ हजार ६६३ एवढी लोकसंख्या दर्शवली आहे.

१०९ प्रभाग महिला राखीव  प्रवर्गात मोडणार

महिला प्रवर्गासाठी एकूण २३६ वर्गापैकी ११८ जागा राखीव राहणार आहेत.  यामध्ये अनुसूचित जातीच्या ८ आणि अनुसूचित जमातीचा १ हे ९ प्रभाग वगळता १०९ प्रभाग हे  महिला राखीव  प्रवर्गात मोडले जाणार आहेत. एकूण २३६ प्रभागांपैकी १७ आरक्षित प्रभाग वगळल्यास सर्वसाधारण प्रवर्गासाठी महिला व पुरुषांसाठी २१९ जागा राखीव राहणार आहेत. तर पुरुष प्रवर्गासाठी मागील वेळेस ११३ प्रभाग राखीव होते, आता ही संख्या ११३ वरून ११८ होणार आहे. त्यामुळे ५  प्रभागांची भर पडणार आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.