…आणि फायर ड्रीलमध्येच अग्निशमन दलाचे तीन जवान जखमी, एकाची प्रकृती चिंताजनक

117

मुंबई अग्निशमन दलाच्या वतीने शनिवारी माटुंगा येथील एका इमारतीमध्ये फायर ड्रील सुरू असताना अग्निशमन दलाचे तीन जवान जखमी झाली आहेत. या तीन पैकी एक जवानांची स्थिती गंभीर असून तिघांवर महापालिकेच्या शीव रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली आहे. इमारतीमध्ये फायर ड्रील सुरू असताना दोन गाड्या यांच्यामध्ये हे जवान अडकले गेले. या अपघातात ते जखमी झाले आहेत अशी माहिती मिळत आहे.

असा घडला प्रकार 

मुंबईतील अनेक उत्तुंग इमारतींमध्ये अग्निशमन दलाच्या माध्यमातून आग प्रतिबंधक उपाय योजना म्हणून आणि आगीसारख्या दुर्घटनेत त्यामध्ये नागरिकाने घ्यावयाच्या दक्षतेबाबत अग्निशमन दलाच्या माध्यमातून माटुंगा पूर्व येथील श्री निधी या इमारतीमध्ये फायर ड्रील सुरू होतं. या फायर ड्रील करता ३ आगीचे बंब (फायर इंजिन) तैनात करण्यात आल्या होत्या. त्यावेळी इमारतीतील रहिवाशांना अग्नी सुरक्षेबाबत माहिती देऊन पुढील अग्नी कवायतीला सुरू करण्यासाठी आगीच्या बंबाचे चालक हे पाईप काढून पाणी फवारणीची प्रक्रिया राबवण्याच्या तयारीत होते. त्याचवेळी एक आगीच्या बंबाचे वाहन पुढे सरकले. त्यावेळी दोन गाड्यांच्या मधोमध फायर इंजिन सुरू करण्याच्या प्रयत्नात असलेले तिन्ही चालक हे गाड्यांमध्ये चिरडले गेले. त्यातील एकाचे पाय पूर्णपणे चिरडले गेले. तर इतर दोघेही जखमी झाले. त्यामुळे या तिघांना शीव रुग्णांलयात दाखल करण्यात आले आहे. यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांचे पायही ढोपरापर्यंत कापण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

(हेही वाचा – अस्लम शेख हे शहराचे पालकमंत्री की मालाडचे?)

दुर्घटनेची चौकशी करण्याची मागणी

दोघांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान या दुर्घटनेप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथील स्थानिक भाजपच्या नगरसेविका राजेश्री शिरवडकर यांनी याबाबत आश्चर्य व्यक्त केले आहे. आग विझवताना जवान जखमी झाले असते तर समजण्या सारखे होते. परंतु वाहने उभी असताना असा अपघात होणे हम्हे आश्चर्य व्यक्त करण्यासारखेच आहे. त्यामुळे या दुर्घटनेची चौकशी केली जावी अशी मागणी त्यांनी केली आहे

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.