बॅंकांची कामे असणा-या नागरिकांना त्यांची कामे वेळेत उरकून घ्यावी लागणार आहे. फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्रातील बॅंका सात दिवस बंद राहणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. त्यामुळे बॅंकाच्या सुट्टयानुसार ग्राहकांना आपल्या कामाचे नियोजन करावे लागणार आहे.
(हेही वाचा – दिलासा! राज्यात एकाच दिवशी पन्नास हजार रुग्णांची कोरोनावर मात )
अशा आहेत बॅंकांना सुट्ट्या
- ६ फेब्रुवारी – रविवार
- १२ फेब्रुवारी – दुसरा शनिवार
- १३ फेब्रुवारी – रविवार
- १९ फेब्रुवारी – छत्रपती शिवाजी महाराज जयंती
- २० फेब्रुवारी – रविवार
- २६ फेब्रुवारी – चौथा शनिवार
- २७ फेब्रुवारी – रविवार
कोरोना काळात विविध बँकांची कामं सध्या ऑनलाइन सुरू आहे. ग्राहकांनी देखील ऑनलाइन प्रणालीचा वापर त्यांच्या दैनंदिन बँकिंग कामासाठी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. दरम्यान तरी देखील तुम्हाला काही आवश्यक कामासाठी बँकेत जाण्याची आवश्यकता असेल तर बँकाच्या सुट्ट्या तपासूनच बँकेला भेट द्या.
Join Our WhatsApp Community