काय सांगताय… स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याने कळणार कोरोना पॉझिटिव्ह आहात की नाही!

159

सध्याच्या युगात वावरत असताना स्मार्टफोन हा जणू आपला सोबतीच झाला आहे. आता याच स्मार्टफोनद्वारे तुम्हाला कोरोना झाला आहे की नाही हे जाणून घेणं सहज सोपं होणार आहे. देशासह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप कमी होत नसल्याने दररोज हजारो लोकांची चाचणी करणाऱ्या प्रयोगशाळांवर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. मात्र आता नवं तंत्रज्ञान तयार करण्यात येणार आहे. ज्यामुळे प्रत्येकाला, अगदी कमी उत्पन्न असलेल्या गटांना देखील त्यांच्या स्मार्टफोनचा वापर करून कोरोनाची चाचणी करणे शक्य होणार आहे.

(हेही वाचा – प्रसारभारती विरुद्ध कर्मचारी अन् श्रोता! ‘एक राज्य एक केंद्र’ या विरोधात राज्य पातळीवर मोहीम सुरू )

नवी कोरोना टेस्ट टेक्नोलॉजी कॅलिफोर्निया विद्यापीठ, सांता बार्बरा येथील संशोधकांनी विकसित केली आहे. यामध्ये सुरुवातीला $100 पेक्षा कमी किमतीची उपकरणे आवश्यक आहे, असे CNET च्या अहवाल म्हटले आहे. तसेच सर्व उपकरणे इंस्टॉल केल्यानंतर प्रत्येक टेस्टची किंमत फक्त $7 (जवळपास 525) इतकी असणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार हे टेस्टिंग अद्याप मोठ्या प्रमाणावर वापरासाठी तयार नाही कारण संशोधकांनी केवळ 50 रूग्णांसह तंत्रज्ञानाची चाचणी केली, ज्यात 20 लक्षणे असलेल्या आणि 30 लक्षणे नसलेल्या रूग्णांचा समावेश आहे आणि सॅमसंग गॅलेक्सी S9 स्मार्टफोन त्यासाठी कॅलिब्रेट केला आहे.

अशी करता येणार चाचणी

  • टेस्ट किट इंस्टॉल करण्यासाठी हॉट प्लेट, रिऍक्टिव्ह सोल्यूशन आणि स्मार्टफोन यांसारखी सामान्य उपकरणं आवश्यक आहे
  • फोनवर बॅक्टिकाउंट नावाचे संशोधकांचे विनामूल्य अॅप डाउनलोड करा
  • हे अॅप फोनच्या कॅमेऱ्याने कॅप्चर केलेल्या डेटाचे विश्लेषण करेल आणि युजर्सला सूचित करेल की त्यांचा कोविड-19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे.

जामा नेटवर्क ओपनवर प्रकाशित झालेल्या पेपरनुसार, युजर्सना त्यांची लाळ हॉट प्लेटवर ठेवलेल्या टेस्ट किटमध्ये ठेवावी लागेल. यानंतर, त्यांना प्रतिक्रियात्मक सोल्यूशन त्यात टाकावे लागेल, त्यानंतर द्रवाचा रंग बदलेल. द्रवाचा रंग किती लवकर बदलतो यावर आधारित लाळेतील व्हायरल लोडचे प्रमाण याचा अंदाच लावण्यासाठी अॅपचा वापर करता येईल.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.