दहावी बारावीच्या परीक्षा मार्च की एप्रिलमध्ये ? काय म्हणाल्या वर्षा गायकवाड?

122

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत आढावा घेऊनच, निर्णय घेतला जाईल असं राज्य शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या बाबतीत 15 फेब्रुवारीपर्यंत आढावा घेऊन, निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

काय म्हणालया शिक्षणमंत्री 

बोर्ड, एसइआरटीसी, शिक्षक संघटना, शिक्षक तज्ज्ञ तसेच मुख्याध्यापक या सगळ्यांशी चर्चा करुन आराखडा ठरवून निर्णय घेतला जाणार असल्याचही वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे. सध्यातरी वेळेवरच परीक्षा होतील आणि त्या ऑफलाईन होतील अशी शक्यता आहे. पुढील शैक्षणिक वर्ष वेळेत सुरु करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे आता परीक्षा आणि अन्य बाबींचा विचार करुनच निर्णय घेतले जातील. पुढील वर्षी अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवली जाईल, असं वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे.

( हेही वाचा: भारतीयांची ‘या’ खाद्य उत्पादनांना खास पसंती ! )

वेळापत्रकानुसार परीक्षा घेण्याचा प्रस्ताव

दहावी- बारावीच्या लेखी परीक्षा आणि त्यासंदर्भातील बदलासाठी मंडळाकडून सरकारला सादर करण्यात आलेल्या प्रस्तावावर दोन दिवसांतच निर्णय होण्याची शक्यता आहे. शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दहावी बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यासाठी सूचना दिल्यानंतर, शिक्षण विभागाकडून आढावा घेतला जात आहे. दुसरीकडे मंडळाने सादर केलेल्या प्रस्तावात वेळापत्रकानुसारच परीक्षा घेण्याचा आग्रह धरण्यात आल्याचे, मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.