भारतात एकीकडे वाढणारी लोकसंख्या हा चिंतेचा विषय बनला आहे. दुसरीकडे लोकसंख्येच्या बाबतीत विचार केला तर पहिल्या क्रमांकावर चीन हा देश आहे. असे असताना देखील चीनने मुलं जन्माला घालण्यासाठी नागरिकांना अनोखी ऑफर दिली आहे. या अजब निर्णयामुळे सर्वत्र चर्चा सुरू आहे. या नव्या योजनेनुसार चीनमध्ये तीन अपत्य जन्माला घालण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चीनची लोकसंख्या वाढू शकते अशी शक्यता आहे.
का घेतला असा निर्णय
चीनमध्ये वाढत्या लोकसंख्येमुळे त्रस्त असल्याने एका अपत्याचे धोरण देशाने स्वीकारले होते. चीनमध्ये आता एकूण लोकसंख्येच्या तुलनेत वृद्धांची संख्या जास्त झाली आहे. त्यामुळे चीनला आता काम करणाऱ्या होतकरू तरूणांची कमतरता भासत आहे. त्यामुळे चीनने असा निर्णय घेतला आहे. या नव्या योजनेनुसार, चीनने तिसरं अपत्य जन्माला घालण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे देशातील कंपन्या सरकारच्या मदतीसाठी पुढे सरसावत आहे.
या कंपनीने दिली मोठी ऑफर
या पार्श्वभूमीवर चीनमधील काही प्रांतांची सरकारं तिसरे मूल जन्माला घालण्यासाठी बोनस देत आहेत. येथे काही स्थानिक सरकारने दुसऱ्या आणि तिसऱ्या मुलाच्या जन्मावर पैसे देण्याची घोषणा केली आहे. तर चीन सरकारने महिलांच्या गर्भधारणेदरम्यान 98 दिवसांच्या मातृत्वाची रजा देण्याबद्दलही सांगितले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चीनमधील टेक कंपनी Beijing Dabeinong Technology Group कडून ही मोठी ऑफर देण्यात आली आहे. या कंपनीने कर्मचाऱ्यांसाठी मोठी ऑफर दिली आहे. तिसरे अपत्य जन्माला आल्यास 90 हजार युआन म्हणजेच 11.50 लाख रुपये बोनस देण्यात येणार असून कर्मचाऱ्याला वर्षभराची सुट्टीही मिळणार आहे.
Join Our WhatsApp Community