शिवसेना-भाजपची युती व्हावी असं महाविकास आघाडीतील ‘या’ मोठ्या पक्षाला वाटतं

170

मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे महाविकास आघाडी म्हणून निवडणूक रिंगणात उतरणार की स्वतंत्रपणे याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. महत्वाचे म्हणजे महाविकास आघाडीमुळे शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये जी मोठी दरी निर्माण झाली आहे ती पुन्हा मिटून येण्याची शक्यता कमीच असल्याचे दिसून येते. मात्र असे असले तरी शिवसेना आणि भाजप हे पुन्हा एकत्र यावे आणि युती म्हणून त्यांनी निवडणूक लढवावी हे आता महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षालाच वाटू लागले आहे. शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवल्याने काँग्रेसच्या जागांची संख्या कमी होते, अशी भीती आता काँग्रेसला वाटू लागली आहे आणि याचमुळे काँग्रेस पक्ष हा अंतर्मनातून शिवसेना-भाजप युती व्हावी यासाठी प्रार्थना करताना दिसत आहे.

मुंबई महापालिकेच्या २०१७ च्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्षाने २२७ जागा लढवल्या होत्या आणि या जागांपैकी काँग्रेसचे ३१ नगरसेवक निवडून आले होते. त्यातील एका नगरसेवकाच्या मृत्यू झाला, त्याठिकाणी भाजपच्या जागृती पाटील निवडून आल्या. विठ्ठल लोकरे यांनी पक्ष सोडला आणि सेनेत प्रवेश करत निवडून आले. तर नगरसेवक राजपती यादव व स्टेफी केणी यांचे पालिका सदस्यत्व रद्द झाले आणि दिन ठिकाणी शिवसेना व भाजप नगरसेवकांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने रफिक शेख व नितीन सलागरे हे दोन नगरसेवक वाढले आहेत. त्यामुळे काँग्रेसचे विद्यमान सदस्य संख्या ही २९ एवढी झाली आहे.

(हेही वाचा – जर वाईन शेतक-यांच्या हिताची, तर गांजाची शेती करण्यासाठी परवानगी द्या!)

आजवरच्या काँग्रेसच्या पाच निवडणुकीच्या तुलनेत २०१७ च्या निवडणुकीतील ही निचांकी संख्या आहे.  काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याच्या म्हणण्यानुसार, शिवसेना आणि भाजप हे स्वतंत्रपणे लढल्यामुळेच कमी नगरसेवक निवडून आले आहे. भविष्यातही शिवसेना आणि भाजपची युती नसल्यास त्याचा फटका आपल्याला बसू शकतो याचीही खात्री काँग्रेसला पटू लागली आहे आणि म्हणूनच काँग्रेस पक्षांच्या नेत्यांना शिवसेना-भाजप यांची युती हवी अशी तीव्र इच्छा दिसून येत आहे. जर १९८५ मधील निवडणुकीचा आढावा घेतला काँग्रेस ३७ जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर १९९२ मध्ये काँग्रेसने आज वरच्या सर्व निवडणुकीच्या तुलनेत सर्वाधिक म्हणजे ११२ जागा मिळाल्या होत्या, तेवढ्या आजपर्यंत सत्ताधारी शिवसेनेलाही मिळवता आलेल्या नव्हत्या.

काँग्रेसला उतरती कळा लागली ती आजतागायत कायम

त्यानंतर काँग्रेस पक्षाला उतरती कळा लागली ती आजतागायत कायमच आहे. १९९७ मध्ये काँग्रेसचे ४९, २००२ मध्ये ६१ नगरसेवक निवडून आले होते. या निवडणुकीनंतर काँग्रेसच्या पारड्यात थोडी जास्त मतं पडली आणि २००७ मध्ये काँग्रेसचे ७६ नगरसेवक निवडून आले. २०१२ मध्ये ही संख्या कमी होऊन ५२ वर आली आणि २०१७ मध्ये काँग्रेसचे ३१ नगरसेवक निवडून आले. १९९२ च्या निवडणुकी नंतर महापालिकेत शिवसेना आणि भाजप हे स्वतंत्र लढून एकत्र आले होते आणि त्यानंतर १९९७ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजप यांची युती झाली होती आणि या युतीत शिवसेना-भाजपचे १२९ नगरसेवक निवडून आले होते. तर काँग्रेसचे निवडून आले होते .

परंतु हा इतिहास असला तरी शिवसेना भाजप मधील युतीच्या उमेदवारा विरुद्ध असलेली नाराजी ही कायम काँग्रेसच्या उमेदवारांच्या पारण्यात पडत गेली आहे हाही तेवढाच इतिहास आहे. त्यामुळेच काँग्रेसच्या नेत्यांना राहून राहून तरी असं वाटतंय की, किमान शिवसेना भाजप यांची युती झाल्यास काँग्रेसची जी संख्या आता कमी आली आहे, ती किमान पन्नास-साठ च्या पुढे जाऊ शकते. काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याच्या म्हणण्यानुसार जरी आम्ही महाविकास आघाडीत असलो तरी महापालिकेतील पक्षाचं आणि विरोधी पक्ष होत राखण्याच्या दृष्टिकोनातून शिवसेना-भाजप यांची युती होणेही तेवढेच महत्त्वाचा आहे. भविष्यामध्ये ही युती न झाल्यास काँग्रेसचं विरोधी पक्षनेते पदही जाऊ जाऊ शकते, अशी भीती त्यांना आहे. त्यामुळेच ही युती होणं हे काँग्रेसच्या नगरसेवकांची संख्या वाढीच्या दृष्टिकोनातूनही आणि महापालिकेतील विरोधी पक्षनेते पद कायम राखण्याच्या दृष्टीकोनातून खूप महत्त्वाची मानली जात आहे.

मागील ७ सार्वत्रिक निवडणुकीतील काँग्रेस नगरसेवकांची संख्या

१९८५ मध्ये ३७ नगरसेवक
१९९२ मध्ये ११२ नगरसेवक
१९९७ मध्ये ४९ नगरसेवक
२००२ मध्ये ६१ नगरसेवक
२००७ मध्ये ७६ नगरसेवक
२०१२ मध्ये ५२ नगरसेवक
२०१७ मध्ये ३१ नगरसेवक

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.