वाघांच्या वाढत्या शिकारीमुळे वन्यप्रेमी चिंतेत!

156

भंडारा गोंदिया जिल्ह्यात जानेवारी २०२२ मध्ये दोन वाघांची शिकार करण्यात आली असून देशात २०२१ पासून ५९ वाघांची शिकार झाली आहे. वनसंपदाने नटलेल्या भंडारा जिल्ह्यात एकूण १३४७.७७ स्क्वेअर किलोमीटर एवढा वनक्षेत्र आहे. या वनक्षेत्रामध्ये वाघ, बिबट, अस्वल यासारखे वन्य प्राणी आहेत. या वन्य प्राण्यांची भंडाऱ्यामध्ये शेतीचे पीक वाचविण्यासाठी, मास खाण्यासाठी आणि अंधश्रद्धेसाठी शिकार केली जात आहे. मागील सात-आठ वर्षामध्ये जवळपास अठरा वाघांची शिकार झाली आहे. यासह इतरही वन्यप्राण्यांची इथे शिकार केली जाते. देशातील मध्यभागी असलेल्या विदर्भाला वाघाचा कॅरिडॉर समजला जातो त्यामध्ये, पेंच, कोका, नवेगाव नागझिरा, उमरेड कराडला, ताडोबा, चिखलदरा, तसाच मध्यप्रदेश येथील कान्हा केशरी, व बालाघाट हा भाग वाणांची आच्छादलेला असल्याने वाघ मोठ्या प्रमाणात मायग्रेट होत असतात, मात्र वाघ प्रादेशिक वनात आल्यानंतर त्यासाठी कुठलेही ठोस उपाययोजन वनविभाग करत नाही त्यामुळे वाघांचे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.

असंरक्षित वनक्षेत्र कडेही लक्ष देण्याची गरज

मध्यप्रदेशच्या फासेपारधी समाजाचे लोक बहुतांश वाघाची शिकार करतात. यासाठी स्थानिक लोकांचीही मदत घेतात. तर अस्वल, रानडुक्कर, बिबट्या, हरीण सारख्या प्राण्यांची शिकार स्थानिक लोकच करतात. विशेषता संरक्षित वनक्षेत्राच्या व्यतिरीक्त प्रादेशिक वन क्षेत्रामध्ये या शिकारी मोठ्या प्रमाणात होत असतात. त्यामुळे शासनाने संरक्षित वनक्षेत्राप्रमाणेच असंरक्षित असलेल्या वनक्षेत्र कडेही लक्ष देण्याची गरज असल्याचे मत वन्यजीव प्रेमींनी व्यक्त केले आहे.

(हेही वाचा – महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे 60 एकरातील उसाचे फड आगीच्या भक्षस्थानी!)

दिवसेंदिवस वाघांच्या शिकारीमध्ये वाढ

निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वन्यजीव प्राण्यांची हत्या करणारे थांबविणे आता गरजेचे आहे. त्यासाठी शासनाने अजून कठोर पावले उचलण्याचे मत वन्यजीव प्रेमींनी व्यक्त केले आहे. देशात २०२१ मध्ये एकूण १६९ वाघांचा मृत्यू झाला आहे, त्यामध्ये ११३ वाघाचा मृत्यू हा नॅचरल झाला आहे, तर ५६ वाघांची शिकार झाली आहे, २०२२ मध्ये या एका महिन्याच्या कालावधीत १३ वाघांचा मृत्यू झाला आहे, त्यात १० वाघांचा नॅचरल मृत्यू झाला असून ३ वाघांची शिकार झाली आहे, या पैकी भंडारा गोंदिया जिल्ह्यात १५ दिवसात दोन वाघांची शिकार झाली असल्याने वनविभागाच्या टायगर बचाव मोहिमेचा वनविभाग फक्त देखावा करतो काय अशाही प्रश्न उपस्थित होत आहे, दिवसेंदिवस वाघांच्या शिकारीमध्ये वाढ होत असल्याने याचा मुख्य कारण दिवसेंदिवस जंगलाची होत असली जंगलतोड त्यामुळे इतरत्र जंगली प्राणी गावाच्या दिशेने कूच करता आहेत, त्यामुळे वन्य प्रणयाच्या शिकारीत वाढ होताना दिसत आहे,

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.