डोंगरीतील सामंतभाई नानजी मार्गाचेही सौंदर्यीकरण

137

मुंबईतील पदपथांच्या सुशोभिकरणाची कामे सध्या महापालिकेच्या माध्यमातून केली जात आहे. आजवर महत्वाच्या रस्त्यांच्या पदपथांची सुधारणा करणाऱ्या महापालिकेच्या माध्यतातून आता डोंगरीतील पदपथही सुशोभित केले जाणार आहे. डोंगरीतील सामंतभाई नानजी मार्गावरील पदपथाचे सुशोभिकरण आता महापालिकेच्या माध्यमातून केले जाणार आहे.

सौंदर्यीकरणासाठी सुमारे ५२ लाख खर्च होणार

महापालिकेच्या बी प्रशासकीय कार्यालयाच्या हद्दीतील प्रभाग क्रमांक २२३ मधील सामंतभाई नानजी मार्गावरील पदपथाच्या सौंदर्यीकरणाचे काम महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात येत आहे. या पदपथाच्या सौंदर्यीकरणासाठी महापालिकेने मागवलेल्या  निविदेमधील पात्र कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे. या पदपथाच्या सौंदर्यीकरणासाठी सुमारे ५२ लाख रुपये खर्च केले जाणार आहे. या कामासाठी एस. के. इन्फ्राप्रोजेक्ट या कंपनीची निवड करण्यात आली आहे.

(हेही वाचा – जोगेश्वरी शिल्पग्राम आणि दादरच्या प्रमोद महाजन उद्यानांच्या देखभालीवर पाच कोटींचा खर्च)

डोंगरीतील सामंतभाई नानजी मार्गावरील पदपथाचे सुशोभिकरण

प्रभाग क्रमांक २२३ मध्ये काँग्रेसच्या नगरसेविका निकिता निकम या आहेत. माजी विरोधी पक्षनेते ज्ञानराज निकम यांच्या मुलीच्या प्रभागात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जानेवारी २०२१ मध्ये बी विभागातील विविध पदपथ, वाहतूक बेट, उड्डाणपुलाखाली मोकळ्या जागेचे सुशोभिकरण आदी सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार बी विभागातील डोंगरीतील सामंतभाई नानजी मार्गावरील पदपथाचे सुशोभिकरण करण्यात येत आहे. स्थानिक काँग्रेस नगरसेविका निकिता निकम यांनी राज्याचे मुख्यमंत्री व प्रशासनातील अधिकाऱ्यांचे धन्यवाद मानले आहे. या पदपथाचे सौंदर्यीकरण झाल्यास विभागातील जनतेला आता चालण्यास प्रशस्त आणि सुशोभित अशी पदपथ मिळेल, असे सांगत याप्रकारे या भागातील पदपथ हे सुशोभित केले जातील, असे सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.