मेट्रोच्या कांजूरमार्ग कारशेडच्या जागेला आग लागली!

113

सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेड परिसरात आग लागली. त्यामुळे महामार्गावरील दीड किलोमीटर अंतरापर्यंत धूर पसरला होता. ही आग दीड तासांत आटोक्यात आली.

आग विझवणे आव्हानात्मक 

कारशेड परिसरातील सुक्या गवताने पेट घेतल्याचे, पाहताच सुरक्षारक्षकांनीच अग्निशमन यंत्रणेला फोन करुन याबाबतची माहिती दिली. हा भाग भराव टाकून बनवला जात असल्याने, येथील अगोदरपासूनच असलेल्या सांडपाण्यामुळे आग विझवणे आव्हानात्मक ठरल्याची माहिती पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते व वनशक्ती या पर्यावरणप्रेमी संस्थेचे प्रकल्प संचालक स्टॅलिन दयानंद यांनी दिली. स्टॅलिन प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित होते. मात्र राजकारणाच्या मुद्द्यावरून आगीचे सत्र पार पडले नसल्याचे, त्यांनी स्पष्ट केले. या आगीत २५ एकर जागेवरील सुके गवत नष्ट झाले.

( हेही वाचा: मुंबईकरांनो, ‘शिथिल’ रहा, पण ‘जबाबदारी’ने वागा! काय म्हणते सरकार? )

स्थानिकांनीच लावली आग

या भागांतील गवतामुळे सरपटणारे प्राणी आता नजीकच्या परिसरात येत आहेत. त्यामुळे स्थानिकांनीच ही आग लावल्याचा अंदाज सुरक्षारक्षकांनी स्टॅलिन दयानंद यांच्याकडे व्यक्त केला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.