आता ‘या’ तारखेपर्यंत भरु शकता मालमत्ता कर! मुदतवाढीचा निर्णय

129

मागील पावणेदोन वर्षांपासून कोरोनाच्या कमी – जास्त प्रसारामुळे नोकरी, व्यवसाय व उद्योगधंद्यांवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. तसेच नागरिकांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना दिलासा मिळण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या, मालमत्ता कर अभय योजनेस मुदतवाढ देणेबाबत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांना नागरिकांकडून विनंती करण्यात येत होती. 31 जानेवारी रोजी अभय योजनेच्या मुदतवाढीचा कालावधी संपत असल्याने, आयुक्तांनी मालमत्ता कर अभय योजनेस 1 महिना म्हणजेच 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

म्हणून वाढवून दिली मुदत

महानगरपालिकेच्या उत्पन्नातील मालमत्ता कर हा मुख्य स्त्रोत असून, 01 ऑक्टोबरपासून 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत थकीत मालमत्ता कराच्या दंडात्मक रक्कमेवर 75 टक्के सूट देणारी मालमत्ता कर अभय योजना जाहीर करण्यात आली होती. या अभय योजनेस 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. तथापि, यामध्ये आणखी काही कालावधीची मुदतवाढ मिळावी, जेणेकरून मालमत्ता कराची थकाबाकी भरताना सवलतीचा लाभ घेता येईल, अशाप्रकारची विनंती विविध स्तरांतून करण्यात येत होती. त्यानुसार महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी आणखी एक महिन्याची म्हणजेच 28 फेब्रुवारीपर्यंत अंतिम मुदतवाढ जाहीर केली आहे.

( हेही वाचा :#Live budget जाणून घ्या केंद्रीय अर्थसंकल्प २०२२ अपडेट…)

विकासास हातभार लावावा

आता मालमत्ता कर अभय योजनेला 28 फेब्रुवारीपर्यंतची अंतिम मुदतवाढ देण्यात आल्याने, थकबाकीदार नागरिक / व्यावसायिक यांनी आपल्या मालमत्ता कराची संपूर्ण थकित रक्कम अधिक 25 टक्के दंडात्मक रक्कम भरल्यास, त्यांना दंडात्मक रक्कमेवर 75 टक्के इतकी मोठ्या प्रमाणावर सूट मिळणार आहे, तरी मालमत्ता कर थकबाकीदार नागरिकांनी या अंतिम मुदतवाढीच्या संधीचा लाभ घेऊन 28 फेब्रुवारीपर्यंत वाट न पाहता आजच नवी मुंबई महानगरपालिकेच्या www.nmmc.gov.in या वेबसाईटला भेट देऊन, दंडात्मक रक्कमेच्या सवलतीसह अभय योजनेचा लाभ घ्यावा व शहर विकासास हातभार लावावा, असे आवाहन बांगर यांच्यावतीने करण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.