केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०२२-२३ चा अर्थसंकल्प सादर केला. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदाचा अर्थसंकल्प सादर होत आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. यंदाचा अर्थसंकल्प निर्मला सीतारमण यांनी मांडल्यावर, यावर राजकीय पातळीवर प्रतिक्रिया येत आहेत. तर, जाणून घेऊया या २०२२-२३ च्या अर्थसंकल्पाविषयी भाजपच्या प्रमुख नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत.
( हेही वाचा : Budget 2022 : काय स्वस्त, काय महाग? वाचा… )
फडणवीस यांची प्रतिक्रिया
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करून हा अर्थसंकल्प हा शेतकरी-कष्टक-यांना दिलासा देणारा आहे, अशी प्रतिक्रिया दिली. भारताला आत्मनिर्भर आणि अधिक बलशाली बनविणारा हा अर्थसंकल्प आहे. असे ट्वीट करत, देवेंद्र फडणवीस यांनी निर्मला सीतारमण आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.
भारताला आत्मनिर्भर आणि अधिक बलशाली बनविणारा हा अर्थसंकल्प आहे.
सर्वसामान्य माणूस, शेतकरी-कष्टकरी अशा सर्वच घटकांना दिलासा देत, भविष्याचा वेध घेणारा हा अर्थसंकल्प मांडल्याबद्दल पंतप्रधान मा. @narendramodi जी, @nsitharaman जी यांचे खूप खूप आभार!#AatmanirbharBharatKaBudget— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 1, 2022
भारताच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेत बदल घडेल – राजनाथ सिंह
जमीन सुधारणांचे डिजिटलायझेशनमुळे (Digitalisation of land reforms) भारताच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेत बदल घडेल. या अर्थसंकल्पामुळे शेतकरी आणि कृषी क्षेत्रात नवीन संधी निर्माण होतील. असे ट्वीट करत, या वर्षीच्या अर्थसंकल्पातील घोषणांचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी स्वागत केले आहे.
( हेही वाचा : Budget 2022: तरूणांना दिलासा! 60 लाख नव्या रोजगाराच्या संधी )
Digitalisation of land reforms will transform India’s rural economy and it will go a long way in creating new opportunities for the farmers and the agriculture sector.
I wholeheartedly welcome this year’s Budget announcements.#AtmaNirbharBharatKaBudget
— Rajnath Singh (@rajnathsingh) February 1, 2022
दूरदर्शी अर्थसंकल्प – अमित शहा
मोदी सरकारने आणलेला हा अर्थसंकल्प दूरदर्शी आहे, यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेचा आकार बदलेल. हा अर्थसंकल्प भारताला स्वावलंबी बनवत, स्वातंत्र्याच्या 100 व्या वर्षात नव्या भारताचा पाया असेल. असे ट्वीट करत, गृहमंत्री अमित शहा यांनी निर्मला सीतारमण आणि पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले आहे.
मोदी सरकार द्वारा लाया गया ये बजट, एक दूरदर्शी बजट है, जो भारत की अर्थव्यवस्था का स्केल बदलने वाला बजट साबित होगा।
ये बजट भारत को आत्मनिर्भर बनाने के साथ स्वतंत्रता के 100वें वर्ष के नए भारत की नींव डालेगा। इसके लिए @narendramodi जी और @nsitharaman जी का अभिनंदन करता हूँ।
— Amit Shah (@AmitShah) February 1, 2022
देशाच्या विकासाला गतीमान करणारं डिजिटल बजेट- चित्रा वाघ
देशाच्या विकासाला गतीमान करणारं डिजिटल बजेट असे ट्वीट करत चित्रा वाघ यांनी या अर्थसंकल्पातील महत्वाचे मुद्दे अधोरेखित केले आहेत.
देशाच्या विकासाला गतीमान करणारं डिजिटल बजेट..
📌डिजिटल रूपया येणार
📌क्रिप्टोकरन्सी कमाईवर ३० टक्के टॅक्स
📌वन नेशन वन रजिस्ट्रेशन
📌 चिपयुक्त ई पासपोर्ट लवकरच येणार
📌 वन विंडो ऑपरेटिंग सेवासुविधा
📌आरोग्यसेवाही डिजिटल करण्यावर भर
📌राष्ट्रीय टेलिमेंटल हेल्थ योजना आणणार..(2)— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) February 1, 2022
( हेही वाचा : Budget 2022 : आता टीव्हीद्वारे पहिली ते बारावीपर्यंत शिक्षण )
भाजप महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यंदाचाही अर्थसंकल्प हा देशातील सर्व घटकांना सामावून घेणारा आणि भारताला आर्थिक महासत्ता होण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकणारा असेल असा विश्वास व्यक्त केला आहे.
Join Our WhatsApp Community