भारतात लवकरच अधिक कार्यक्षम आणि वेगवान अशी 5-जी इंटरनेट सुविधा सुरू होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज, मंगळवारी अर्थसंकल्पात याबाबत घोषणा केली आहे.
5-जी मोबाइल सेवांसाठी आवश्यक स्पेक्ट्रम लिलाव
यासंदर्भात सीतारमन यांनी सांगितले की, यंदा 2022 मध्ये खाजगी टेलिकॉम कंपन्यांच्या 5-जी मोबाइल सेवांसाठी आवश्यक स्पेक्ट्रम लिलाव आयोजित केला जाईल. ग्रामीण आणि दुर्गम भागात परवडणारे ब्रॉडबँड आणि मोबाईल कम्युनिकेशन सक्षम करण्यासाठी पीएलआय योजनेचा एक भाग म्हणून 5-जी इकोसिस्टमसाठी डिझाईन नेतृत्वाखालील उत्पादनाची योजना सुरू केली जाईल. परवडणारी ब्रॉडबँड आणि मोबाईल सेवा सक्षम करण्यासाठी आणि ग्रामीण भागात प्रसार करण्यासाठी, निधी अंतर्गत वार्षिक संकलनाच्या 5 टक्के वाटप केले जाईल.
(हेही वाचा – Budget 2022: यंदाच्या बजेटमध्ये संरक्षण क्षेत्रात तब्बल 10 टक्क्यांनी वाढ)
Spectrum auction will be conducted to roll out 5G mobile services within 2022-23 by private firms, says FM
— Press Trust of India (@PTI_News) February 1, 2022
2022-23 पासून डिजिटल रुपया चलनात येणार
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पीय भाषणात आणखी एक मोठी घोषणा केली आहे. येत्या आर्थिक वर्षापासून 2022-23 पासून डिजिटल रुपया चलनात येणार आहे. रिझर्व्ह बँकेकडून डिजिटल करन्सी लागू होणार आहे. मागील काही महिन्यांपासून डिजिटल चलनाबाबत चर्चा सुरू होती. आता डिजिटल चलनाबाबत अर्थसंकल्पीय भाषणात शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community