नाशिक येथील मिलिटरी वसाहतीत सोमवारी सकाळी झालेल्या बिबट्या दर्शनाने तब्बल सात तास वनविभागाचा बिबट्या पकडण्याचा कार्यक्रम सुरु होता. वनविभागाला तुरी देत चार वर्षांच्या नर बिबाट्याने बारा बंगल्याचा स्वैर संचार केला. अखेर बिबट्याला बेशुद्ध करून पकडण्यात वनविभागाची चांगलीच दमछाक झाली.सोमवारी सकाळी सातच्या सुमारास बिबट्या देवळाली परिसरात दिसून आल्याची तक्रार वनविभागाला मिळाली. त्यानुसार वनविभाग अर्ध्या तासात घटनास्थळी दाखल झाले. देवळाली परिसरात नेमका कुठे बिबट्या लपला आहे हे मात्र काही केल्या सापडत नव्हते.
तब्बल बारा बंगल्यात भ्रमंती
वेगवेगळ्या भागातील तब्ब्ल तीन सीसीटीव्ही केमेरे तपासल्यानंतर बिबट्या कोणत्या भागातून नुकताच गेला याची माहिती वनाधिकाऱ्यांना आली. एका बंगल्यातील गाडीखाली बिबट्या लपल्याची माहिती घरमालकानेच वनविभागाला दिली. मात्र बिबट्या तिथून पळून जाण्यात यशस्वी ठरला. बिबट्याने एकामागोमाग एक तब्बल बारा बंगल्यात भ्रमंती केली. बंगल्याच्या दरवाज्यावर उभ्या असलेल्या एका माणसावर हल्ला केला. या हल्ल्यात इसमाला किरकोळ जखमा झाल्या.
(हेही वाचा – Budget 2022: बजेटमध्ये स्पेक्ट्रम लिलावाची घोषणा, देशात येणार 5G सुविधा)
अखेर बिबट्या जेरबंद झाला
बिबट्या पुन्हा एका बंगल्यातील गाडीखली लपल्याचे वनअधिकाऱ्यांनी शोधून काढले. अगोदर संपूर्ण बंगल्यालाच वनअधिकाऱ्यांनी जाळे लावले. हे जाळे हळूहळू गाडीबाहेर आणले. बिबट्याला बेशुद्ध केले गेले. बिबाट्याला जेरबंद करून मोहीम फत्ते करेपर्यंत दुपारचे दोन वाजले.
बिबट्याची वैद्यकीय तपासणी पूर्ण झाली आहे. अहवाल आल्यानंतर बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल – विवेक भदाणे, वनपरिक्षेत्रपाल, नाशिक, वनविभाग (प्रादेशिक)
भक्ष्याच्या शोधात आला बिबट्या
देवळालीतील मिलिटरी संकुलात हजारो सेक्टरभागात विस्तीर्ण जंगल आहे. या जंगलात बिबट्याचा अधिवास आहे. देवळाली परिसरातील बंगल्यातील कुत्रे खायला बिबटे मानवी हालचाल बंद झालेली असताना मध्यरात्री किंवा भल्या पहाटे येतात. हा बिबट्या भल्या पहाटे आला असावा आणि नंतर वाट चुकला असावा, असा अंदाज वनविभागाने व्यक्त केला.
Join Our WhatsApp Community