सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत संतोष परब यांना झालेल्या मारहाण प्रकरणी भाजपाचे आमदार नितेश राणे यांना अखेर सिंदुधुर्ग सत्र न्यायालयानेही जामीन फेटाळून लावला. त्यामुळे नितेश राणे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दरम्यान न्यायालयाने निर्णय देताच राणे यांना अटक करण्यासाठी हालचाली सुरू केली, मात्र त्याच वेळी भाजप कार्यकर्त्यांनी न्यायालयासमोर गोंधळ घालायला सुरूवात केली.
नितेश राणे उच्च न्यायालयात गेले
त्याच वेळी भाजपाचे नेते निलेश राणे यांनी याला विरोध केला. तसेच पोलिसांसोबत वादावादी सुरू झाली. कारण निलेश राणे यांची गाडी पोलिसांनी थांबवली. त्यावर निलेश राणे यांनी गाडी का थांबवली?, तुम्हाला कुणी अटक करायला सांगितले? असे विचारले असता, वरिष्ठांनी थांबवण्यास सांगितला आहे, असे म्हटले. त्यावर निलेश राणे यांनी, सर्वोच्च न्यायालयाने १० दिवसांचे संरक्षण दिले आहे. असे सांगत निलेश राणे आणि भाजप कार्यकर्त्यांच्या गराड्यात घेऊन जाऊ लागले, तेव्हाही पोलिसांसोबत पुन्हा बाचाबाची झाली. दरम्यान प्रथम राणे यांनी शरण यायला हवे होते, त्यानंतर जामीन अर्ज केला पाहिजे, मात्र तसे न करता जामीन अर्ज केल्यामुळे फेटाळून लावला. राणे यांच्या वकिलाने मुंबई उच्च न्यायालायात आव्हान दिले.
(हेही वाचा केंद्रीय अर्थसंकल्प २०२२ : आयकर आकारणीत काहीही बदल नाही!)
Join Our WhatsApp Community