शिक्षक पात्रता परीक्षेतील (टीईटी) घोटाळ्यांमुळे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे कामकाजच थंडावले आहे. विविध परीक्षा कोणामार्फत घ्यायच्या याबाबत राज्य शासनाकडून अद्याप काहीच ‘ग्रीन’ सिग्नल मिळालेला नाही. दरम्यान, विविध परीक्षा घेण्यात काहीच चूक केलेली नसताना ‘विनर’ सॉफ्टवेअर कंपनीचे कामकाज तूर्तास महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने थांबविले आहे. यामुळे आगामी सर्वच परीक्षांबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
दरवर्षी विविध परीक्षा
राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने दरवर्षी विविध परीक्षा घेण्यात येत असतात. या परीक्षा घेण्यासाठी खासगी कंपनीकडून निविदा मागवून त्यांना कोट्यवधी रुपयांचा ठेका देण्यात येत असतो. मागील तीन वर्षे जी.ए. सॉफ्टवेअर ऍन्ड टेक्नॉलॉजी या कंपनीला कामाचे कंत्राट देण्यात आले होते. त्यानंतर पुढे आता तीन वर्षासाठी ‘विनर’ सॉफ्टवेअर कंपनीला कंत्राट देण्यात आले आहे.
( हेही वाचा : बिबट्यानं घेतली बारा बंगल्यांची हजेरी! अखेर 7 तासांनी बिबट्या जेरबंद )
लाखो रुपयांची उलाढाल
2018 आणि 2020 च्या ‘टीईटी’ परीक्षेत लाखो रुपयांची उलाढाल करून अपात्र उमेदवारांना पात्र करण्यात आल्याचा घोटाळा उघडकीस आला आहे. यात आजी-माजी संचालकांनाही अटक करण्यात आली आहे. यात जी.ए.सॉफ्टेवर ऍन्ड टेक्नॉलॉजी कंपनीचे माजी संचालक म्हणून सौरभ त्रिपाठी यांनाही या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community