दुर्दैवी! कोळसा खाणीत दबून 13 जणांचा मृत्यू

102

झारखंडच्या धनबाद येथे कोळसा खाणीत मलबा अंगावर पडून 13 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज, मंगळवारी घडली. यात 12 हून अधिक लोक अजूनही ढिगाऱ्याखाली दबले असल्याची भीती व्यक्त केली जातेय. दरम्यान, घटनास्थळी मदत आणि बचावकार्य युद्धपातळावर सुरू करण्यात आले असून, घटनेतील जखमींना रुग्णालयात दाखल करण्याता आले आहे.

गोरखधंद्यामुळे कोट्यवधींचा महसूल बुडतोय

झारखंडच्या धनबाद जिल्ह्यातील अनेक भागांत बेकायदेशीर कोळसा उत्खनन व्यवसाय सुरू आहे. धनबादचा निरसा परिसर अवैध कोळसा उत्खनन आणि व्यवसायाचं केंद्र बनला आहे. निरसा परिसरातून बेकायदेशीर कोळसा उत्खनन करून बंगाल आणि इतर राज्यांमध्ये पाठवला जातो. पोलिसांच्या संगनमताने गेल्या अनेक वर्षांपासून हा अवैध धंदा सुरू आहे. या गोरखधंद्यामुळे शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडतोय. यासोबतच बेकायदेशीर कोळसा उत्खननादरम्यान मलबा पडून कामगारांचा मृत्यूही होतो.

(हेही वाचा – व्यावसायिक गॅस सिलिंडर 91.50 रुपयांनी स्वस्त)

अचानक 20 फुट उंचीवरून कोसळला मलबा

आज ही घटना घडली त्यावेळी महिला, पुरुष आणि लहान मुलांसह अनेकजण या ठिकाणी अवैध उत्खनन करण्यासाठी आलेले होते. यावेळी अचानक 20 फुट उंचीवरून मलबा कोसळला. या घटनेची माहिती मिळताच धनबादच्या निरसा पोलिसांनी घटनास्थळ गाठून प्रकरणाची चौकशी केली. त्यानंतर कोळशाने गाडलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी जेसीबी मशीनने खोदकाम करण्यात आले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.