MMR मधील वाहतूक कोंडी, प्रदूषणापासून सुटका; लवकरच ग्रीन हायवे होणार तयार

दिल्ली-मुंबई अंतर १२ तासांवर येणार

147

दिल्ली ते जेएनपीटी महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर दिल्ली ते मुंबई हे अंतर अवघ्या १२ तासांत पार करता येणार आहे. या महामार्गावरून अवजड वाहने शहराच्या बाहेरून मार्गस्थ होणार असल्याने मुंबई, ठाणे, कल्याण शहरातील वाहतूक कोंडी आणि त्याबरोबरच प्रदूषणही कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी यांनी व्यक्त केला.

वॉटर टॅक्सीमुळे प्रवासाचा वेळ कमी 

कल्याणच्या सुभेदार वाडा कट्ट्याच्या वतीने आयोजित स्वर्गीय नेते राम कापसे व्याख्यानमालेमध्ये त्यांनी ऑनलाईन प्रणालीद्वारे सहभाग घेतला. गडकरी पुढे म्हणाले की, मुंबईनजीक नवी मुंबई विमानतळ येथे विमानतळ होत आहे, त्या दृष्टीने वॉटर टॅक्सी हा प्रकल्प तयार केला आहे. दक्षिण मुंबईतील लोकांनी मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये यायचे आणि आठ सीटर वॉटर टॅक्सीत बसले, तर १३ मिनिटांत नवी मुंबई एअरपोर्ट गाठता येणार आहे. त्या एअरपोर्टवरून ठाणे, कल्याणलाही वॉटर टॅक्सीने जोडता येईल. यामुळे प्रवासाचा वेळही कमी होईल.

(हेही वाचा – सत्र न्यायालयानेही नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळला! आता पुढे काय? )

ई हायवे, ग्रीन हायवे तयार होणार

या पुढे ई वाहनाचा वापर करण्यावर भर दिला जाणार आहे. ई वाहनामुळे प्रति किलोमीटर प्रवास खर्च कमी होईल. त्या अनुषंगाने ई हायवे आणि ग्रीन हायवे तयार केले जातील. त्यामुळे प्रदूषण कमी होऊन वेळेची बचतही होईल. तसेच लॉजिस्टीकवर होणाऱ्या अतिरिक्त खर्चाची बचत होण्यास मदत होईल. तंत्रज्ञानाचा वापर करून देशाच्या सर्वागीण विकासासाठी काम केले पाहिजे. नागपूरच्या धर्तीवर रोड, त्याच्यावर पूल, त्यावर मेट्रो असे बांधले असते, तर वेस्टर्न बायपास-इस्टर्न बायपासची क्षमता दुप्पट झाली असती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.