अशी असणार अमरावती महापालिकेची प्रभाग रचना, आरक्षण सोडत प्रलंबित

124

आयोगाला सादर करण्यापूर्वीच बहुचर्चित झालेली अमरावती महापालिकेची प्रभाग रचना आज जाहीर झाल्या आहेत. या प्रभाग रचनेवर १४ फेब्रुवारीपर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. २ मार्चला अंतिम प्रभाग रचना होईल, त्यानंतर असणारी आरक्षण सोडत यावेळी राहणार नाही, त्यासाठी आयोगाद्वारा स्वतंत्र आदेश देण्यात येणार आहे.महापालिकेच्या निवडणूक विभागासमोर या याद्या लावम्यात आल्या असून आयुक्त डॉ आष्टीकर यांनी आज पाहणी केली.

निवडणुका किमान महिनाभर लांबणीवर

राज्य निवडणूक आयोगाचे शनिवारी रात्री आदेश धडकल्यानंतर महापालिका आयुक्तांनी मंगळवारी प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केला त्यामुळे आता खऱ्या अर्थाने महापालिका निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झालेली आहे. ८ मार्चला महापालिकेची मुदत संपत आहे. त्यापूर्वी २ मार्चला अंतिम प्रभाग रचना होणार असल्याने निवडणुका किमान महिनाभर लांबणीवर पडणार व प्रशासकराज राहणार, हे निश्चित आहे. सुधारित प्रारूप प्रभाग रचना ५ जानेवारीला सादर करण्याचे आयोगाचे आदेश असताना आयोगाचे कार्यालयात कोरोना संक्रमितांची नोंद झाल्याने प्रारूप प्रभाग रचना प्रलंबित होती व त्यानंतर आता १ फेब्रुवारीला प्रभाग रचना प्रसिद्ध होत आहे.

(हेही वाचा – MMR मधील वाहतूक कोंडी, प्रदूषणापासून सूटका; लवकरच ग्रीन हायवे होणार तयार)

बहुसदस्यीय प्रभाग रचनेमध्ये ३२ प्रभाग तीन सदस्यांचे व एक दोन सदस्यांचा राहणार आहे. एकूण प्रभाग रचनेची प्रक्रियाच लांबणीवर पडल्याने आगामी निवडणूकदेखील लांबणीवर पडणार असल्याचे संकेत आहेत.मात्र भाजप चे कार्यकर्ते निवडणुकीला नेहमीच तयार असतो प्रभाग रचना चांगली असून येणारी निवडणूक आम्हीच जिंकू असा विश्वास महापौर चेतन गावंडे यांनी व्यक्त केला

असा आहे प्रभाग रचनेचा कार्यक्रम

  • * १ फेब्रुवारीला निवडणूक प्रभागाच्या सीमा दर्शविणारी प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध होणार आहे.
  • * १४ फेब्रुवारीपर्यंत हरकती व सूचना मागविण्यात येतील व नोंदविल्या जातील.
  • * प्राप्त हरकती व सूचना १६ फेब्रुवारीला राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केल्या जातील.
  • * आयोगाने प्राधिकृत अधिकाऱ्यामार्फत २६ फेब्रुवारीपर्यंत सुनावणी होणार आहे.
  • * २ मार्चला प्राधिकृत अधिकाऱ्यामार्फत शिफारसी आयोगाकडे पाठविण्यात येणार आहे.

प्रभाग कार्यालयात दाखल करता येतील हरकती

प्रभागरचनेवर १ ते १४ फेब्रुवारी दरम्यान हरकती व सूचना महापालिकेतील निवडणूक कार्यालयात किंवा संबंधित प्रभाग कार्यालयाच्या मुख्यालयात नागरिकांना सादर करता येणार आहेत. या नागरिकांना सुनावणीकरिता उपस्थित राहण्यासाठी स्वतंत्रपणे कळविण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्तांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.