संतोष परब यांच्यावर हल्ल्याप्रकरणी आमदार नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. त्यातच आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे ज्येष्ठ पुत्र निलेश राणे यांच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे तेही अडचणीत आले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाबाहेर पोलिसांशी हुज्जत घातलेली
सर्वोच्च न्यायालयाने आमदार नितेश राणे यांना १० दिवसांत सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात शरण जाऊन जामीन अर्ज दाखल करण्याचा आदेश दिला होता. त्याप्रमाणे नितेश राणे मंगळवारी सत्र न्यायालयात आले. न्यायालयाने त्यांना जामीन नाकारताच पोलिसांनी नितेश राणे यांना अटक करण्यासाठी हालचाली सुरु केल्या. मात्र त्यावेळी माजी खासदार निलेश राणे यांनी त्याला विरोध केला. पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. निलेश राणे यांनी गाडी का थांबवली?, तुम्हाला कुणी अटक करायला सांगितले का?, अशी विचारणा केली. त्यावर स्थानिक आमदार वैभव नाईक यांनी या प्रकरणी नितेश राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्याप्रमाणे बुधवारी निलेश राणे यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमाव बंदीचा आदेश मोडणे, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे हे गुन्हे निलेश राणे यांच्यावर दाखल करण्यात आले आहेत.
(हेही वाचा सरकारला अल्टीमेटम! वीज कंपन्यांचे पैसे द्या, अन्यथा अंधारात बसा…)
Join Our WhatsApp Community