सुपर मार्केटमधील वाईन विक्रीच्या निर्णयाला पवारांचाच विरोध, म्हणाले…

128

राज्यभरातील सुपरमार्केटमधून वाईनची विक्री करता येणार असल्याचा निर्णय राज्य सरकारने गेल्या काही दिवसांपूर्वीच घेतला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाला विविध क्षेत्रातून विरोध होऊ लागला आहे. विरोधकांनीही सरकारच्या या निर्णयावर चांगलेच टिकास्त्र सोडले आहे. ठाकरे सरकारच्या या निर्णयाला विविध स्तरांतून विरोध सुरू आहे. दरम्यान सुपर मार्केटमधील वाईन विक्रीच्या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अध्यक्ष शरद पवार यांनीच विरोध दर्शविल्याचे समोर आले असून राज्य सरकारच्या या निर्णयावर शरद पवार यांनी भाष्य केले आहे.

काय म्हणाले शरद पवार

राज्य सरकारने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला दिलेली परवानगी आणि त्याला होत असलेला विरोध हा काही फार चिंतेचा विषय नसल्याचे शरद पवारांनी सांगितले आहे. सरकारच्या निर्णयाला जर अनेक स्तरातून विरोध होत असेल आणि राज्य सरकारने या संदर्भात निर्णय बदलला तरी त्याचे मला वाईट वाटण्याचे कारण नाही असेही पवार यांनी स्पष्ट केले.

(हेही वाचा – लोकल प्रवासी स्वतःहूनच झाले मास्क मुक्त आणि मग…)

वायनरींच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उत्पन्न

राज्य मंत्रिमंडळाने वाईन विक्रीसंदर्भात मोठा निर्णय जाहीर केल्यानंतर सुपर मार्केटमध्ये वाईनची विक्री करता येणार आहे. राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत सुपर मार्केट, वॉकिंग स्टोअरमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. देशभरातील सर्वच राज्यांमध्ये दुकानात देशी आणि विदेशी दारू मिळते, त्यात वाईन ही अत्यंत कमी प्रमाणात विकली जाते. देशातील सर्वाधिक द्राक्ष उत्पादन हे नाशिक जिल्ह्यात होते. संपूर्ण नाशिक जिल्ह्यात एकूण 18 वायनरी असून त्या वाईनचे उत्पादन घेतात. ही वाईन केवळ मोठाल्या मॉल्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यासंदर्भात सरकारने मंजुरी दिली आहे. वायनरींच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न मिळते, मात्र त्याला विरोध होत असले तर सरकाने या संदर्भात काही वेळा निर्णय घेतला, तो निर्णय मागे घेतला तरी त्याचे वाईट वाटण्याचे कारण नाही, असेही शरद पवार म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.