नाशकातील सातपूरच्या कारखान्यात भीषण अग्नितांडव! पहिला मजला जळून खाक

142

नाशिक जिल्ह्यातील सातपूर एमआयडीसी परिसरात असलेल्या निलराज कारखान्यात बुधवारी पहाटे भीषण आग लागली. ही आग इतकी भीषण असल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू होते. यावेळी घटनास्थळी 12 अग्निशमन बंब पोहोचले होते.

अशी घडली घटना

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी पहाटे पाचवाजेच्या सुमारास ही घटना घडली. आग लागल्याचे समजताच महापालिकेच्या अग्निशमन दलास संपर्क साधून अग्निशमन दलाचे 3 बंब, एमआयडीसीचा 1 बंब, महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीचा 1 बंबासह इतरही बंब घटनास्थळी दाखल झाले. या घटनेत कंपनीच्या पहिल्या मजल्यावर कॅपॅसिटरसाठी लागणारे ॲल्युमिनियम कॅपच्या गोदामाला आग लागली होती. या आगीत ॲल्युमिनियम कॅप व खोके जळून खाक झाले. ही आग महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसह एकूण 25 जणांनी मिळून विझवली. आगीत कॅपॅसिटर बसवण्यासाठी लागणारा लाखो रुपयांचा कच्चा माल जळाल्याचे सांगितले जात आहे.

(हेही वाचा – सुपर मार्केटमधील वाईन विक्रीच्या निर्णयाला पवारांचाच विरोध, म्हणाले…)

…म्हणून टळला मोठा अनर्थ

सातपूर औद्योगिक वसाहतीत निलराज इंडस्ट्रीत (प्लॉट नंबर ३४ ए निलराज इंजीनियरिंग) लागलेल्या भीषण आगीचे कारण अद्याप समोर आले नाही. ही आग शॉर्टसर्कीटमुळे लागली की आणखी कशाने लागली याचा तपास सध्या सुरू आहे. या भीषण आगीत कंपनीचा पहिला मजला जळून खाक झाला असल्याची माहिती मिळतेय. मात्र या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही. पहाटे लागलेली ही भीषण आग सकाळी बराच वेळ भडकत होती. साधारणः10 वाजेपर्यंत आग विझवण्याचे काम सुरू होते. कारखान्यात ही आग कर्मचारी नसताना लागल्याने मोठा अनर्थ टळल्याचे सांगितले जात आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.