मुंबईला मागे टाकत, हा जिल्हा मुलांच्या लसीकरणात अग्रेसर!

125

कोरोनावर मात करण्यासाठी अत्यावश्यक असलेल्या कोरोना लसीकरणाच्या मोहिमेत मुंबईला मागे टाकत भंडारा जिल्हा अग्रेसर ठरला आहे. पंधरा ते अठरा वर्षाच्या मुलांसाठी सुरू असलेल्या लसीकरणामध्ये भंडारा जिल्हा संपूर्ण महाराष्ट्रात सध्या प्रथम असून या लसीकरणाची टक्केवारी 76.10 टक्के एवढी आहे. तसेच सामान्य लसीकरणामध्ये सुद्धा भंडारा जिल्हा महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकावर आहे.

( हेही वाचा : खुशखबर! माझगाव डॉकमध्ये दीड हजार नोकऱ्यांची संधी… )

शिक्षकांचे सहकार्य

जिल्ह्यात 15 ते 17 या वयोगटात एकूण 59 हजार 568 मुल-मुली आहेत. या पैकी 45 हजार 334 मुला -मुलींचे लसीकरण 30 जानेवारी पर्यंत झाले आहे. या लसीकरणाची टक्केवारी 76.10 टक्के एवढी आहे. हे लसीकरण यशस्वी करण्यासाठी शिक्षण विभागाने केलेले कार्य प्रशंसनीय असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. शिक्षणाधिकारी, बीडीओ आणि सर्व शिक्षक यांनी दररोज याविषयी योजना आखून प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांचे लसीकरण व्हावे यासाठी प्रयत्न केले. खाजगी शाळेतील शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना बसेस द्वारे लसीकरण केंद्रावर पोहोचवून लसीकरण प्रक्रिया पूर्ण केली. या वयोगटातील मुल- मुली हे जागरूक असल्यामुळे त्यांना लसीकरणाविषयी अधिक समजवण्याची गरज भासली नाही मात्र काही पालकांना या लसीकरणाविषयी सांगण्याची गरज भासली. येत्या काळातही लसीकरणावर भर दिला जाईल आणि यासाठी शक्य तेवढी यंत्रणा कामाला लावली जाईल असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

( हेही वाचा : लोकल प्रवासी स्वतःहूनच झाले मास्क मुक्त आणि मग… )

लसीकरण पूर्ण करा

कोरोना पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी लसीकरण हा सर्वोत्तम उपाय असल्यामुळे मी पहिल्याच दिवशी लसीकरण करून घेतले. आज मी लसीकरणाचा दुसरा डोस घेतला असून लसीकरण झाल्यानंतर मला कुठलाही त्रास जाणवला नाही. माझ्या लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण झाल्यामुळे येणाऱ्या परीक्षेत मी निर्भिडपणे पेपर देण्यासाठी जाऊ शकते. त्यामुळे माझ्या वयोगटातील सर्व तरुण-तरुणींना विनंती आहे की त्यांनी ही त्यांचं कर्तव्य समजून लसीकरण पूर्ण करून परीक्षा देण्यासाठी जावे असे लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेल्या एका मुलीने सांगितले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.