सभागृहातील कामकाजाबाबात उपराष्ट्रपतींकडून चिंता व्यक्त, म्हणाले…

116

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या प्रारंभी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष एम. व्यंकय्या नायडूंनी राज्यसभा सदस्यांनी विशेष आवाहन केले. सभागृहातील व्यवधान (कामकाज) संस्कृती चिंताजनक असल्याचे नायडू म्हणाले.

स्वातंत्र्य आंदोलनाचे लक्ष्य स्वराज्य होते

सभागृहात सदस्यांना आज, बुधवारी संबोधित करताना नायडू म्हणाले की, हे सत्र ‘आज़ादी का अमृत काल’ दरम्यान आयोजित होत असून आपल्या स्वातंत्र्य आंदोलनाचे लक्ष्य स्वराज्य होते ज्यात नागरिक स्वतः निवडलेल्या संस्थांद्वारे स्वतःच्या भविष्याचे अधिनेता होते. उपराष्ट्रपती म्हणाले की, या वर्षी 1952-53 झालेल्या पहिल्या लोकसभा- सामान्य सार्वत्रिक निवडणुकांना सत्तर वर्ष पूर्ण होत असून लोकशाही इतिहासातील महत्वपूर्ण घटना आणि स्मृतीचे साक्षीदार हे सदन आणि सत्र होत आहे. आज़ादी का अमृत महोत्सव निमित्त हे अपेक्षित आहे की, आपण गेल्या 75 वर्षात या कायदेमंडळ संस्थेच्या उपलब्धी आणि कार्यकलाप याची समीक्षा करावी.

(हेही वाचा – मुंबईला मागे टाकत, हा जिल्हा मुलांच्या लसीकरणात अग्रेसर!)

नायडूंनी व्यक्त केला खेद

नायडू पुढे म्हणाले की, गेल्या हिवाळी अधिवेशनात सदन आणि कामकाज बैठकीत 52.10% भाग व्यवधानात व्यर्थ गेला. यापूर्वी पावसाळी मानसून सत्रात 70.40% भाग वाया गेला. नायडूंनी खेद व्यक्त करीत सांगितले की, व्यवधान संस्कृती चिंताजनक आहे. राज्यसभेचे अध्यक्ष म्हणाले की, जानेवारी 2020 पासून कोविड महामारीत हे सहावे सत्र असून कोरोना ची तिसरी लहर आणि नूतन संसर्ग संक्रमणशील आहे. त्यामुळे दोन्ही सभागृहाच्या दोन भागांत बैठकी वेगवेगळ्या ठेवण्यात आल्या आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.