भाजपचे आमदार नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने मोठा झटका दिल्याचे समोर आले आहे. न्यायालयाने दोन दिवस म्हणजेच 4 फेब्रुवारीपर्यंत नितेश राणेंना पोलीस कोठडी सुनावली आहे. या निर्णयामुळे नितेश राणेंना आजची आणि उद्याची रात्र कणकवली पोलिसांच्या कोठडीत काढावी लागणार आहे. नितेश राणेंच्या वकिलांकडून जामिनासाठी अर्ज देखील दाखल करण्यात येणार आहे.
राणेंच्या अडचणीत मोठी वाढ
दरम्यान, 4 फेब्रुवारीपर्यंत नितेश राणेंचा मुक्काम कोठडीतच असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणात नितेश राणेंच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. राकेश परब यांनाही 4 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. नितेश राणेंना संतोष परब हल्लाप्रकरणी न्यायालयाने यापूर्वीच जामीन अर्ज फेटाळला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दिवाणी न्यायालयात नितेश राणे शरण गेले होते. त्यानंतर याप्रकरणी युक्तिवाद झाला. हा युक्तिवाद झाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने नितेश राणेंबाबात हा निर्णय़ जाहीर केला आहे.
राणेंच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार?
संतोष परब मारहाण प्रकरणी डोक्यावर अटकेची टांगती तलवार असलेले भाजपचे आमदार नितेश राणे यांचा जामीन अर्ज सिंधदुर्ग सत्र न्यायालयाने फेटाळून लावल्यावर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. बुधवारी मात्र नितेश राणे यांनी उच्च न्यायालयातून अर्ज मागे घेतला असून ते कणकवली न्यायालयात हजर राहण्यासाठी गेले होते. दरम्यान जिल्हा सत्र न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतरही जामीन अर्जावरील सुनावणीदरम्यान 4 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. सरकारी वकिलांनी न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर सरकारी वकिलांनी चौकशीसाठी पोलीस कोठडीची मागणी केली होती.
(हेही वाचा – समीर वानखेडेंच्या वाशीतील बारचा परवाना रद्द! कोणी केली कारवाई?)
पुन्हा कणकवली न्यायालयात हजर रहावे लागणार
परब यांना मारहाण झाल्याप्रकरणी कणकवली न्यायालयाने जामीन नाकारल्यावर नितेश राणे मुंबई उच्च न्यायालयात गेले, उच्च न्यायालयानेही जामीन नाकारल्यावर राणे सर्वोच्च न्यायालयात गेले. सर्वोच्च न्यायालयानेही जामीन अर्ज नाकारला. त्यावेळी न्यायालयाने राणे यांना 10 दिवसांत शरण जा आणि जमीन अर्ज दाखल करा, असा आदेश दिला होता. त्याप्रमाणे राणे शरण न जाता आधी जामीन अर्ज दाखल केला. त्यामुळे न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यावर राणे हे पुन्हा उच्च न्यायालयात गेले. बुधवारी, 2 फेब्रुवारी रोजी त्यांनी जामीन अर्ज मागे घेतला आणि कणकवली न्यायालयात शरण जाण्यास निघाले. त्यामुळे नितेश राणे यांना पुन्हा कणकवली न्यायालयात हजर राहण्याचा आदेश दिला आहे.
Join Our WhatsApp Community