अनिल देशमुख यांनी झटकले हात, शिवसेना आली गोत्यात

130

पोलिसांच्या बदल्या बाबत राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी इडीला दिलेल्या जबाबात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. देशमुख आपल्याला पोलिसांच्या बदल्यांसाठी यादी पाठवायचे असे ते म्हणाल्याने देशमुखांच्या अडचणी वाढल्या होत्या. याला आठवडा होत नाही तोच देशमुखांनी त्या बदल्यांच्या याद्या शिवसेना नेते अनिल परब द्यायचे,असे सांगत अनिल देशमुख यांनी अक्षरशः हात झटकले आहेत. यामुळे मात्र महा विकास आघाडीत आघाडीचा पक्ष असलेली शिवसेना आता चांगलीच अडचणीत सापडली आहे. इतकेच नाही तर देशमुख यांच्या या नव्या मोठ्या गौप्यस्फोटामुळे अनिल परब यांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

परबांचे नाव आल्याने प्रकरणाला नवं वळण

तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख हे माझ्याकडे पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी अनधिकृत याद्या पाठवायचे, असा गौप्यस्फोट सीताराम कुंटे यांनी ईडीला दिलेल्या जबाबात म्हटले होते. सीताराम कुंटेंचा जबाब अनिल देशमुख यांच्यासाठी मोठा धक्का असल्याचे मानले जात होते. आता अनिल देशमुख यांनी अनिल परब यांचे नाव घेऊन या प्रकरणाला नवं वळण मिळाले आहे.

(हेही वाचा – नितेश राणेंना झटका! 4 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत मुक्काम)

जबाबात अनिल देशमुखांनी काय म्हटले…

ज्या काही बदल्या झालेल्या आहेत त्यासाठीची यादी आपल्याला एका कॅबिनेट मंत्र्याने दिल्याचे चार्जशीटमध्ये म्हटले आहे. याबाबत ज्यावेळी अनिल देशमुख यांना प्रश्ऩ विचारण्यात आले त्यावेळी त्यांनी अनिल परब यांनी ही यादी दिल्याचा खुलासा केला आहे. मला कुठल्याही व्यक्तीने यादी दिलेली नव्हती, तर अनिल परब यांनी यादी दिली होती आणि हीच यादी आपण अतिरिक्त मुख्य सचिवांना दिल्याचे अनिल देशमुख यांनी दिलेल्या जबाबात म्हटले आहे.

परब ही यादी कुठून आणायचे याबाबत ईडीकडून विचारणा

तसेच या यादीमध्ये जी काही नावे आहेत त्यांची त्यांना हव्या त्या ठिकाणी बदली करावी असे सांगण्यात आले होते. या यादीची कुठेही नोंद नसून आलेली ही यादी आपण एसीएस खात्याला पाठविली होती. अनिल परब ही यादी कुठून आणायचे याबाबत ईडीकडून विचारणा केली असता, देशमुख यांनी असे सांगितले की, अनिल परब कदाचित शिवसेनेच्या आमदारांकडून ही यादी घ्यायचे आणि त्यानंतर ती मला पाठवायचे असे देखील देशमुख यांनी म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.