किती तोडा, किती फोडा… भाजपचाच महापौर बसणार!

189

मुंबई महापालिकेत सत्ताधारी पक्षाच्या भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांविरोधात आवाज उठवणाऱ्या महापालिकेतील भाजपचे गटनेते, पक्षनेते, प्रवक्ते यांच्यासह जे जे म्हणून भाजपचे नगरसेवक मजबूत आहेत, त्या सर्वांच्या प्रभागांची मोडतोड करण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही कितीही प्रभागांची मोडतोड करा, कितीही तोडफोड करा किंवा फोडाफोडी करा…भाजपचे नगरसेवक हे मागील निवडणुकीच्या तुलनेत जास्त संख्येने निवडून येणार आणि येत्या महापालिकेत भाजपचाच महापौर विराजमान झालेला पहायला मिळणार, असा विश्वास महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते व भाजप आमदार राजहंस  सिंह यांनी व्यक्त केला आहे.

निवडणुकीकरता २३६ प्रभागांचे सिमांकन जाहीर

मुंबई महापालिका निवडणुकीकरता २३६ प्रभागांचे सिमांकन जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये भाजपचे आमदार आणि खासदार असलेल्या मतदार संघातील भाजपचे नगरसेवक असलेल्या प्रभागांच्या सिमा जाहीर करताना त्यात अनेक प्रकारच्या त्रुटी आढळून येत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या सर्व नगरसेवकांची बैठक महापालिकेतील भाजप कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. यामध्ये प्रत्येक नगरसेवकांकडून बदलण्यात आलेल्या नव्या प्रभागांची माहिती जाणून घेत त्यांच्या हरकती नोंदण्याच्या सूचना करण्यात आल्या आहे. या बैठकीला आमदार मिहिर कोटेचा, माजी विरोधी पक्षनेते राजहंस सिंह यांच्यासह महापालिका गटनेते प्रभाकर शिंदे, पक्षनेते विनोद मिश्रा यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.

(हेही वाचा – अनिल देशमुख यांनी झटकले हात, शिवसेना आली गोत्यात)

प्रभागांची तोडफाड करून घेतला बदला

या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलतांना राजहंस सिंह यांनी जे जे भाजपचे नगरसेवक महापालिकेतील सत्ताधारी पक्ष आणि प्रशासनातील भ्रष्टाचाराबाबत बोलत होते, त्यांचेच प्रभाग तर तोडलेच. शिवाय भाजपसाठी अनुकूल असलेल्या मतदार संघातील भाजप नगरसेवकांचेही प्रभागही फोडण्यात आले आहे. महापालिकेतील या भ्रष्टाचाराविरोधात बोलणाऱ्या भाजपच्या नगरसेवकांच्या प्रभागांची तोडफाड करून एकप्रकारे बदला घेण्यात आला आहे. यासंदर्भात जो काही आक्षेप व हरकती असतील ते आम्ही नोंदवूच, असे सांगत त्यांनी येणाऱ्या निवडणुकीत शिवसेनेला त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय जनता स्वस्थ बसणार नाही, असाही इशारा दिला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.