माहिमच्या समुद्र किनारी प्रेमीयुगलावर हल्ला, तरुणाचा मृत्यू

149

माहिमच्या समुद्र किनारी बसलेल्या प्रेमीयुगलावर दोन ते तीन अनोळखी इसमानी तीक्ष्ण हत्याराने वार करून लुटण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना बुधवारी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास घडली. या हल्ल्यात तरुणाचा मृत्यु झाला असून तरुणी गंभीररीत्या जखमी झाली आहे. या तरुणीवर सायन रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी माहिम पोलिसांनी हत्या व हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार हल्लेखोरांनी तरुणावर हल्ला केल्यानंतर तरुणीवर बळजबरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

( हेही वाचा : डोंबिवली प्रदूषणमुक्त होणार! काय आहे कारण? )

हल्ला करून लुटण्याचा प्रयत्न

मोहम्मद वसीम शेख (२१) असे हल्ल्यात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. गोवंडी शिवाजी नगर या ठिकाणी राहणारा मोहम्मद वासिम शेख हा वाहन चालक असून दोन वर्षांपूर्वी तो दुबई येथून मुंबई आला होता. त्याच परिसरात राहणाऱ्या एका २० वर्षीय तरुणीसोबत मोहम्मद वसीम याचे प्रेमप्रकरण सुरू होते. मंगळवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास हे दोघे माहिम समुद किनारी गप्पा मारीत बसलेले असताना त्या ठिकाणी आलेल्या दोन ते तीन जणांनी या दोघांवर चाकूने हल्ला करून लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला. या हल्ल्यात मोहम्मद वसीमचा घटनास्थळी मृत्यू झाला असून तरुणीच्या गळ्यावर वार करण्यात आले आहेत. तिला पोलिसांनी उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल केले आहे.

हल्लेखोरांचा शोध सुरू

सीसीटीव्ही फुटेज च्या माध्यमातून हल्लेखोरांचा शोध सुरू असल्याची माहिती माहिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण कदम यांनी दिली. हा हल्ला नक्की कुठल्या वादातून झाला याबाबत अद्याप काहीही कळू शकलेले नाही. तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे, सूत्रांच्या म्हणण्यानुसार हल्लेखोरांनी या तरुणीवर बळजबरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मोहम्मद वसीम याची हत्या त्याची प्रियकर असलेल्या तरुणीने केल्याचा संशय वसीमच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.