निवडणुकीच्या राजकारणातून ‘या’ मंत्र्याने घेतला संन्यास

93

माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी निवडणुकीच्या राजकारणातून संन्यास घेतला आहे. यापुढे निवडणूक लढवणार नाही, अशी घोषणा प्रभू यांनी कणकवलीत झालेल्या व्यापारी महासंघाच्या मेळाव्यात केली. यापुढे आपण पर्यावरणाचे काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सेनेच्या माध्यमातून सिंधुदुर्गात विकासाची पायाभरणी

यासंदर्भात सुरेश प्रभू म्हणाले की, 2014 मध्ये लोकसभा निवडणुक लढविली नव्हती, तशीच यापुढेही निवडणूक लढवणार नाही. मात्र, प्रत्येक माणसाशी संबधित असलेल्या पर्यावरणाचा प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य देणार असल्याची ग्वाही सुरेश प्रभू यांनी दिली. राजकारणात आल्यानंतर शिवसेनेच्या माध्यमातून सिंधुदुर्गात विकासाची पायाभरणी केली असल्याचे प्रभू म्हणाले. हवामानात बदल होत असल्याने वादळांची संख्या वाढते. अवकाळी पाऊस वर्षभर कोसळण्याची शक्यता निर्माण झाली. त्यामुळे पर्यावरणाचे प्रश्न सोडविण्याला प्राधान्य दिले आहे, असे प्रभूंनी यांनी सांगितले.

(हेही वाचा – किती तोडा, किती फोडा… भाजपचाच महापौर बसणार!)

राजापूर मतदारसंघाचे सलग 4 वेळा प्रतिनिधित्व

लोकसभेत राजापूर मतदारसंघाचे सलग 4 वेळा प्रतिनिधित्व केलेले, अटलबिहारी वाजपेयी आणि मोदी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपद भूषवलेले सुरेश प्रभू सध्या राजकारणापासून दूर असल्याचे दिसत होते. मोदी सरकारच्या दुसर्या कारकिर्दीत त्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली नाही. आता त्यांनी, यापुढे राजकारणाबाहेरचे प्रश्न सोडवायचे असल्याचे सांगत निवडणुकीच्या राजकारणाला रामराम ठोकला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.