पालघरमध्ये पहिल्यांदाच मुलांपेक्षा मुलींचा जन्मदर अधिक!

125

पालघरमधून लिंग गुणोत्तराबाबत दिलासादायक बातमी समोर आली आहे. येथे अपेक्षेपेक्षा लिंग गुणोत्तर वाढले आहे. जिल्ह्यात मुलींच्या जन्माच्या संख्येत वाढ झाल्याने, यावर्षी हजारामागे 22 मुलींच्या जन्माचे प्रमाण वाढले आहे. 2020-21 मध्ये हजार मुलांमागे 947 मुली होत्या, त्यात 2020-21 मध्ये 969 पर्यंत वाढ झाली आहे.

…म्हणून वाढला जन्मदर

पालघर जिल्ह्यातील आरोग्य विभाग शासकीय व खासगी आरोग्य संस्थांसह इतर ठिकाणच्या जन्म-मृत्यू नोंदणीपासून महिला गुणोत्तराची माहिती घेते. तसेच भ्रूणहत्या आणि गर्भातून लिंग चाचणी याबाबत वेळोवेळी जनजागृती मोहीम राबवते. यासोबतच जिल्ह्यातील सोनोग्राफी केंद्रांवर बारकाईने तपासणी केली जात असल्याने, मुलींचा जन्मदर वाढण्यास मदत झाली आहे.

…नाहीतर याहून अधिक असती संख्या

पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी आणि वसई विरार भागातील महिला मोठ्या संख्येने प्रसूतीसाठी जिल्ह्याबाहेर जातात. त्यामुळे त्यांची जिल्ह्यात नोंदणी झालेली नाही. पालघर जिल्ह्यात डिसेंबरपर्यंत 17 हजारहून अधिक मुलींचा जन्म (जिवंत जन्म) झाला आहे आणि 18 हजारहून अधिक मुलांचा जन्म झाला आहे (जिवंत जन्म). कोरोना संसर्गामुळे महिलांना प्रसूतीसाठी जिल्ह्याबाहेर किंवा इतर ठिकाणी जावे लागत असल्याचे, आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. अन्यथा मुलींची संख्या आणखी वाढू शकली असती.

(हेही वाचा महापालिकेच्या शाळांमधून वन्यजीव आणि जैवविविधतेची आता माहिती : शिक्षण विभागासाठी यंदा ३,३७० कोटींची तरतूद)

पालघरमध्ये 100 पुरुषांमागे 969 महिला

महाराष्ट्रात हजार पुरुषांमागे 928 स्त्रिया आहेत. पालघर जिल्ह्यात यंदा  हजार पुरुषांमागे महिलांची संख्या 969 झाली आहे. आरोग्य विभाग विविध उपाययोजनांद्वारे ही संख्या आणखी वाढविण्याचा प्रयत्न करत आहे. भ्रूणहत्या रोखण्यासाठी बनवण्यात आलेल्या पीसीपीएनडीटी कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात आहे. या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीचे नाव सांगणा-या व्यक्तीची ओळख  गुप्त ठेऊन, त्याला एक लाखाचे बक्षीसही देण्यात येते.

डिसेंबर 2021-2022 पर्यंतचा डेटा

मुलांचा जन्म -18 हजार 472
मुलींचा जन्म – 17 हजार 895

2020-21 आकडेवारी

मुलांचा जन्म – 28 हजार 708
मुलींचा जन्म -27 हजार 180

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचा दावा

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी म्हणाले की, पालघर हा आदिवासीबहुल जिल्हा आहे. येथील आदिवासींनी भ्रूणहत्येसारखे दुष्कृत्य कधीच केलेले नाही. त्यामुळे लिंग गुणोत्तराच्या दृष्टिकोनातून महिलांची संख्या समाधानकारक आहे. जिल्ह्यातील सोनोग्राफी केंद्रे आरोग्य विभागाच्या रडारवर आहेत. पीसीपीएनडीटी कायद्याचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.