पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेतून ग्रामीण भागात घरे बांधण्यासाठी वर्ष 2018-19 ते 2020-21 अशा गेल्या तीन वर्षांच्या कालावधीत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना 93,494.83 कोटी रुपये (महाराष्ट्राला देण्यात आलेल्या 4260.96 कोटी रुपयांसह) देण्यात आले आहेत, अशी माहिती केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी लिखित उत्तराद्वारे राज्यसभेत दिली.
(हेही वाचा – ठरलंच…दहावी, बारावी परीक्षा ऑफलाईन! अभ्यासक्रमात कपात…)
महाराष्ट्रामध्ये गेल्या तीन वर्षांत पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेतून बांधण्यात आलेल्या घरांची जिल्हानिहाय आकडेवारी परिशिष्टात दिली आहे. या योजनेतून सर्व राज्यांमध्ये उभारलेल्या घरांचे जिल्हानिहाय तपशील पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेच्या https://www.pmayg.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
“सर्वांसाठी घरे” उभारण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा हेतू
ग्रामीण भागामध्ये, “सर्वांसाठी घरे” उभारण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी केंद्रीय ग्रामविकास मंत्रालय 1 एप्रिल 2016 पासून पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेची अंमलबजावणी करत आहे. या योजनेच्या माध्यमातून मुलभूत सुविधा असलेली 2 कोटी 95 लाख घरे बांधण्याच्या उद्दिष्टासह ग्रामीण भागातील पात्र कुटुंबांना मदत पुरविली जात आहे. या योजनेसाठीचे पात्र लाभार्थी म्हणून 2011 साली केलेल्या सामाजिक आर्थिक जातीनिहाय जनगणनेत मिळालेल्या माहितीवरून जे या योजनेतून मदत मिळण्यासाठीचे लाभार्थी ठरतात पण ज्यांचा समावेश त्या जनगणनेतील लाभार्थ्यांच्या यादीत नाही अशांचीच नावे निश्चित केले जातात.
Join Our WhatsApp Community