यूपीत शिवसेनेने पाठिंबा दिलेला उमेदवार चप्पलेचा हार घालून फिरतोय!

97

उत्तर प्रदेशच्या अलीगढ विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराला अनोख्या पद्धतीने सुरुवात झाली आहे. त्यामुळे अलीगढ विधानसभेचा हा प्रचार चांगलाच चर्चेत आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक जवळ आल्याने राजकीय वातावरण देखील चांगलंच रंगलं आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि मुख्य विरोधक असलेल्या समाजवादी पक्षात जोरदार टक्कर पाहायला मिळत आहे. सत्ता बदलण्यासाठी समाजवादी पार्टीने कंबर कसली असून अपक्ष उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. या मतदारसंघातील अपक्ष उमेदवार पंडित केशव देश यांचा निवडणूक प्रचार लक्षवेधी ठरला आहे.

भाजप धमक्या देत असल्याचा आरोप

अपक्ष उमेदवार असलेल्या पंडित केशव देश यांना शिवसेनेने पाठिंबा दिला आहे. त्यांना निवडणूक चिन्ह वाटप झाले असून त्यांचं निवडणूक चिन्ह चप्पल आहे. या साहेबांना बुट, चप्प्लाचे चिन्ह मिळाले त्यानंतर हे उमेदवार गळ्यात चपलांचा हार घालून प्रचार करत आहेत. लोकांच्या भेटीगाठी घेऊन मतदान करण्याचं आवाहन करत आहेत. यावेळी भाजप नेते धमक्या देत असल्याचा आरोप केशव देश यांनी केला आहे. पंडित केशव देश अलिगडमधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत.

(हेही वाचा – मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात गरीब, श्रीमंत वर्गाचे विभाजन)

जीवाला धोका असून केली गनरची मागणी

बुधवारी, केशव देश एलआययू कार्यालयात दाखल झाले. आपल्या जीवाला धोका असून त्यांनी एका गनरची मागणी केली आहे. ते म्हणाले, प्रचार सुरू असताना भाजप नेते आपल्या सोबत काहीतरी बरं वाईट करू शकतात. जीवाला असलेला धोका लक्षात घेऊन गनर देण्यात यावा, अशी मागणी देश यांनी केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.