पाकिस्तानसाठी सतत नवीन संकटे उभी करणा-या बलुचिस्तानमधील बंडखोरांनी पाकिस्तानी सैनिकांवर हल्ला केल्याची माहिती आहे. या हल्ल्यात 100 पाकिस्तानी सैनिक मारले गेले असल्याचा, दावा बंडखोरांनी केला आहे. मात्र एक पाकिस्तानी सैनिक मारला गेला असल्याचे पाकिस्तानकडून सांगण्यात आले आहे. तसेच चार दहशतवाद्यांना ठार करत त्यांना प्रत्युतर दिले असल्याचे, पाकिस्तानने सांगितले आहे. बलूच बंडखोरांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
पाकिस्तानचा प्रतिहल्ला
मिळालेल्या माहितीनुसार, नैऋत्य बलुचिस्तान प्रांतात सशस्त्र हल्लेखोरांनी लष्कराच्या चौक्यांवर हल्ला केला. नौशकी आणि पंजगूर भागातील दोन सुरक्षा चौक्यांवर हल्लेखोरांनी हल्ला केला. पहिला हल्ला हा बलुचिस्तान जिल्ह्यातील पंजगुर जिल्ह्यात झाला. त्यानंतर पाकिस्ताननेही या हल्ल्याला प्रत्युत्तर देत दहशतवाद्यांना ठार केले. तसेच या हल्ल्यात बंडखोरांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याचे, पाकिस्तानी लष्कराने म्हटले आहे.
( हेही वाचा :जवानांचा गणवेष घालणं मोदींना पडलं महागात! )
हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा तळ उद्ध्वस्त
पाकिस्तानी लष्कराने आपल्या निवेदनात, क्रॉस फायरमध्ये 1 जवान शहीद झाल्याचे मान्य केले. या भागात दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू असल्याचे, सांगण्यात येत आहे. फ्रंटियर कॉर्प्सने देखील कबूल केले आहे की त्यांच्या छावणीजवळ दोन स्फोट झाले आहेत आणि गोळीबार सुरू आहे. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या हल्ल्यात 100 पाकिस्तानी सैनिक मारले गेल्याचा दावा बीएलएने केला आहे. त्यांच्या या भीषण हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा तळ जवळजवळ उद्ध्वस्त झाल्याचे त्यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community